Home | Sports | From The Field | Mumbai Indians defeated Chennai Super Kings for a second time in consecutive session

मुंबई इंडियन्स संघाकडून सत्रात सलग दुसऱ्यांदा चेन्नईच्या सुपरकिंग्जचा पराभव

वृत्तसंस्था | Update - Apr 27, 2019, 07:25 AM IST

सातव्या विजयासह मुंबईची दुसऱ्या स्थानी धडक; चेन्नईचा चाैथा पराभव

 • Mumbai Indians defeated Chennai Super Kings for a second time in consecutive session

  चेन्नई - तीन वेळच्या किताब विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबई संघाने ४६ धावांनी धाेनीच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या चेन्नईवर मात केली. यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने यंदाच्या सत्रात सलग दुसऱ्यांदा चेन्नईचा पराभव केला.


  राेहितच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने चेन्नईसमाेर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मलिंगा (४/३७), कृणाल (२/७) अाणि बुमराह (२/१०) यांनी धारदार गाेलंदाजी करताना यजमान चेन्नईचा १७.४ षटकांत अवघ्या १०९ धावांवर खुर्दा उडवला.


  राेहितचे यंदा पहिले अर्धातक :

  मुंबई इंडियन्सला कर्णधार राेहित शर्माने दमदार सुरुवात केली. त्याने लेव्हिससाेबत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, माेठ्या खेळीच्या प्रयत्नात असलेला लेव्हिस (३२) बाद झाला. दरम्यान, राेहितने यंदाच्या सत्रात पहिले अर्धशतक साजरे केले. त्याचे आयपीएलमधील हे ३५ वे अर्धशतक ठरले. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि ३ षटकारांच्या आधारे ६७ धावांची खेळी केली. हार्दिकने नाबाद २३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.


  पांड्या बंधू चमकले :

  तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाकडून हार्दिक आणि कृणाल हे दाेघे पांड्या बंधू चमकले. त्यांनी अष्टपैलू खेळी करताना विजयात माेलाचे याेगदान दिले. हार्दिकने २३ धावांची खेळी केली. कृणालने दाेन बळी घेतले.

Trending