आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीकडून मुंबई इंडियन्स संघाचा धुव्वा, ऋषभ पंतची ७८ धावांची नाबाद धडाकेबाज खेळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीन वेळच्या  चॅम्पियन मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. यजमान मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पाहुण्या दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने सामन्यात मुंबईचा धावांनी ३७ पराभव केला. यासह दिल्लीने यंदाच्या आयपीएलमधील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. राेहितच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई संघ घरच्या मैदानावर अपयशी ठरला. आता मुंबईचा सामना २८ मार्च राेजी बंगळुरूशी हाेईल.  

 


यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (७८) नाबाद अर्धशतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमाेर २१४ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा १९.२ षटकांत १७६ धावांवर खुर्दा उडाला. ईशांत आणि कागिसाे रबाडाने प्रत्येकी दाेन विकेट घेऊन मुंबईचे कंबरडे माेडले.   मुंबईकडून विजयासाठी युवराज सिंगने (५३) एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला घरच्या मैदानावरील पराभव टाळता आला नाही. राेहित शर्मा अवघ्या १४ धावांची खेळी करून  पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला माेठी खेळी करता आली नाही. 

 


ऋषभ पंत चमकला :

दिल्ली संघाकडून सामन्यात ऋषभ पंत चमकला. त्याने झंझावाती खेळी करताना शानदार अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूंमध्ये प्रत्येकी सात चाैकार अाणि षटकारांच्या अाधारे नाबाद ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.