आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Is The Gateway To Cruise Tourism, 259 Cruises And 2 Lac Tourists Come Here.

मुंबई देशातील क्रूज टुरिझमचे गेटवे, येथे 259 क्रूज आणि 2 लाख पर्यटक येऊ शकतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुंबई देशाचे क्रूज डेस्टिनेशन बनले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातील क्रूज रुटुरिझम वाढवण्यासाठी जहाजबांधणी मंत्री असण्यादरम्यान खूप गोष्टींना सुरुवात केली होती. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. कारण एकट्या मुंबईमध्ये येणाऱ्या क्रूज टुरिस्टची संख्या आता 86,757 ने वाढून यावर्षीच्या शेवटपर्यँत 1.81 लाख होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.  


मुंबई पोर्ट ट्रस्टनुसार देशामध्ये 2018 मध्ये एकूण 285 क्रूज आले. यामध्ये एकट्या मुंबई पोर्टवर 106 क्रूज आले. हे देशातील एखाद्या शहरामध्ये सर्वात जास्त आहेत. त्यामुळे मुंबई आता हळू हळू ‘गेट वे फॉर क्रूज टुरिझम इन इंडिया’ बनत आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यँत देशामध्ये 593 क्रूज येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 259 क्रूज मुंबईच्या क्रूज टर्मिनलवर वेगवेगळ्या वेळी पोहोचतील.  

215 यात्रेकरूंसाठी मुंबई मेडन सेवा शुक्रवारपासून सुरु...  
मुंबईच्या डोमेस्टिक क्रूज टर्मिनलवरून मागच्यावर्षी मुंबई ते गोवा अंग्रीया नावाची क्रूज सेवा सुरु झाली होती. सूरत आणि मुंबई यातील शुक्रवारपासून सुरु झालेली मुंबई मेडन सेवा याचाच पुढचा भाग आहे. 215 प्रवासी क्षमता असणाऱ्या या क्रूजचे तिकीट 4000 ते 5000 रुपयांच्या मध्ये आहे. मुंबई मेडन नावाची ही क्रूज सेवा महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि गुजरात मेरीटाइम बोर्ड यांच्या मदतीने एसएसआर मरीन सर्विसने सुरु केली आहे. 

इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलवर 300 कोटी रुपये खर्च होतील...  
मुंबईच्या 'भाऊचा धक्का'च्या पर्पल गेट येथील डोमेस्टिक क्रूज टर्मिनलची पॅसेंजर क्षमता 2,000 ने वाढून 4,000 केली गेली आहे. याचप्रकारे इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलची क्षमता डिसेंबरपर्यंत 3,000 होईल. याच्या विस्तारावर 300 कोटींचा खर्च केला जात आहे.  

परदेशी क्रूजमधून 712 कोटी रुपये टॅक्स, 5 हजारांना रोजगार... 
भारतात कोस्टा क्रूजच्या प्रतिनिधी आणि लोटस डेस्टिनेशनच्या नलिनी गुप्ता यांनी सांगितले की, भारतीय क्रूज प्रवाश्यांची संख्या 2 लाख झाली आहे.  सध्या परदेशी क्रूज प्रवाश्यांकडून 712 कोटी रुपये टॅक्स आणि 5 हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगारदेखील मिळतो. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मुंबई, कोच्ची, गोवा, न्यू मंगळूर आणि चेन्नईच्या क्रूज टर्मिनलचे इंफ्रास्ट्रक्चर सुधारले जात आहे. यावर वर्षभरामध्ये 955 परदेशी क्रूज पोहोचतील तर देशामध्ये क्रूज टुरिझम मार्केट 35 हजार कोटींपर्यंत पोहोचले आहे. 

बातम्या आणखी आहेत...