आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न ग्रुपमध्ये महिलेला केले ॲड..ग्रुप अॅडमिनला अटक, होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखांचा दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पोलिसांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. मुश्ताक अली शेख असे या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनचे नाव आहे. मुश्ताकवर एका महिलेला त्याचा पॉर्न व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतल्याचा आरोप आहे. आपल्या ग्रुपमध्ये घेण्यापूर्वी मुश्ताकने संबंधित महिलेची परवानगी घेणे गरजेचे होते. मुस्ताकच्या व्हॉट्‍सअॅप ग्रुपवर पॉर्नोग्राफिक काँटेन्ट शेअर होत होता. पोलिसांनी पहिल्यादाच अशाप्रकारची कारवाई केल्यामुळे सोशल मीडियात चर्चा सुरु झाली आहे.

 

पहिल्यांदा झाली अशी कारवाई

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी पहिल्यादाच अशा प्रकारची कारवाई केली आहे. या कारवाईसोबतच मुंबई पोलिसांनी ताकीद दिली आहे की, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणालाही त्याच्या परवानगीशिवाय सहभागी करून घेता येणार नाही. तसेच ग्रुपवर अश्लील काँटेन्ट शेअर केल्यास संबंधित ग्रुप अॅडमिनवर कारवाई केली जाऊ शकते.

 

असे आहे प्रकरण

पोलिसांनी सांगितले की, महिलेने तक्रार केल्यानुसार, तिला सप्टेंबर महिन्यात एका 'XXX' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेण्यात आले होते. या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात पॉर्नोग्राफिक काँटेन्ट शेअर केला जात होता. विशेष म्हणजे तक्रारदार महिला,  मुश्ताक आणि ग्रुपमधील इतर 12 मेंबर्सपैकी कोणालाही ओळखत नाही. तिच्या परवानगीशिवाय तिला ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी मुश्ताकला IT अॅक्टनुसार छेडछाडीच्या आरोपखाली अटक केली आहे.

 

तज्ज्ञांनी दिली ही माहिती

या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयातील सीनिअर अॅडव्होकेट संजय मेहरा यांनी सांगितले की कोणत्याही महिलेला तिच्या परवानगीशिवाय आक्षेपार्ह काँटेन्ट शेअर होत असलेल्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतल्यास IT अॅक्टअंतर्गत सेक्शन 66E नुसार कारवाई होऊ शकते. या प्रकरणात आरोपीला 3 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखांचा दंड भरावा लागू शकतो.

 

ग्रुप अॅडमिनने घ्यावी या गोष्टींची काळजी

1. ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो, मेसेज शेअर करु नये किंवा होऊ देऊ नये.
2. ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक व्हिडिओ, फोटो, मेसेज किंवा ऐतिहासिक आकडेवारी शेअर करु नये. 
3. ग्रुप अॅडमिनने जाती किंवा धर्माविषयी द्वेष पसरवणारा काँटेन्ट शेअर होणार नाही याची काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...