आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ऑनर किलिंग? गर्भवती नवविवाहितेची निर्घृण हत्या, घाटकोपरच्या फुटपाथवर अशा अवस्थेत सापडला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील घाटकोपर परिसरात एका नवविवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणनगर परिसरातील एका ऑटो स्टँडजवळ रविवारी सकाळी या महिलेचा मृतदेह एका ऑटोरिक्शा चालकाला दिसला. त्यानेच पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पीडित महिला गर्भवती होती तसेच तिचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. या प्रकरणी खुनाचा खटला दाखल करण्यात आला असून पोलिस सविस्तर तपास करत आहेत.


7 महिन्यांपूर्वी कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध केला होता प्रेम विवाह
एका प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव मीनाक्षी चौरसिया असे होते. तसेच ती आपला पती बृजेश चौरसियासोबत राहत होती. त्याने पोलिसांनी सांगितले, की मीनाक्षी आणि त्याचा विवाह 7 महिन्यांपूर्वीच झाला होता. दोघांच्या नात्याला मीनाक्षीच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळेच, त्यांनी घरातून पळून लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसांतच ती गर्भवती झाली. बृजेशने सांगितल्याप्रमाणे, शनिवारी (13 जुलै) संध्याकाळी ती रुग्णालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. उशीर झाल्यानंतर बृजेशला झोप लागली. सकाळी त्याची झोप मोडल्यानंतर आपल्या परिसरात एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. ती आपलीच पत्नी असल्याचे कळताच त्याने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

 

ऑनर किलिंगची शक्यता

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, प्राथमिक तपासात घटनास्थळावरून महिलेचे मंगळसूत्र आणि मोबाईल दोन्ही सापडले आहेत. त्यामुळे, ही घटना लुटीतील घडली असावी हे शक्य नाही. तिला ठार मारण्यासाठीच हल्ला करण्यात आला होता. पीडित महिलेच्या पतीसह तिच्या वडिलांची सुद्धा चौकशी केली. मीडिया रिपोर्टनुसार, चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. त्यांनी ऑनर किंलिंगच्या नावे आपल्या मुलीची हत्या केल्याच्या दिशेने आता तपास सुरू करण्यात आला आहे.