आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसमाेर ठेवलेली किमान समान कार्यक्रमाची अट जवळपास पूर्ण झाली आहे. गुरुवारी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एक बैठक घेऊन एकमताने समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला. यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांत एकमत झाले.
या बैठकीला शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक व काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले की, ‘आम्ही समान कार्यक्रम बनवला आहे. तो तिन्ही पक्षाच्या श्रेष्ठींना पाठवला जाईल. जाहीरनाम्यांतील एकेका मुद्द्यावर चर्चा झाली. एक-दोन मुद्द्यांवर एकमत अजून बाकी आहे. त्यावरही लवकरच निर्णय हाेईल.
साेनिया- पवार पुन्हा भेटणार
१८ नोव्हेंबरपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची रविवारी किंवा सोमवारी भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच हाेईल : नवाब मलिक
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपपासून शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान राखणे ही काँग्रेस व राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असे आमदार नवाब मलिक यांनी सांगितले.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलेला मसुदा असा
> सरसकट शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा ७/१२ काेर करणे
> खासगी उद्याेगांमध्ये भूमिपुत्रांना ७५% नोकऱ्या
> बेराेजगारांना भत्ता
> सवलतीत आराेग्य तपासण्या
> माफक दरात शिक्षण
> मुस्लिमांना ५ % आरक्षण
> पीक विमा याेजनेत सुधारणा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.