आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील 350 पेक्षा जास्त शेतक-यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील 1348 शेतक-यांचे कर्ज फेडण्याचा दावा केला आहे. सोमवारी ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली. लोनची एकुण रक्कम 4.05 कोटी रु. असल्याचे बोलले जात आहे. बिग बींनी यासाठी बँक ऑफ इंडियाकडून वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्लानची डील करुन सर्व शेतक-यांचे कर्ज एकाच वेळी फेडले आहे. अमिताभ बच्चन मुलींना घरातील लक्ष्मी मानतात. सोमवारी त्यांनी लेक श्वेता बच्चनच्या हस्ते शेकत-यांना बँकेचे लेटर दिले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपुर्वी KBC मध्ये महाराष्ट्रातील हिंगोलीचे शेतकरी अनंत कुमार हॉट सीटवर बसले होते. आनंद यांची वेदनादायी कथा ऐकल्यानंतर बिग बी यांनी हात जोडून देशातील लोकांना शेतक-यांची मदत करण्याचे अवाहन केले होते.
बिग बी यांनी 1348 शेतक-यांमधून 70 शेतक-यांना मुंबईमध्ये येऊन बँकेतून आपले कर्ज फेडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
- अमिताभ बच्चन यांनी शेतक-यांना येण्यासाठी ट्रेनचे एक पुर्ण कम्पार्टमेंट स्वतः बुक करुन दिले होते.
तेव्हा या शेतक-यांचे कर्ज फेडले होते
- काही महिन्यांपुर्वी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील 350 शेतक-यांचे कर्ज फडले होते. यासोबतच त्यांनी 44 शहीदांच्या कुटूंबांनाही आर्थिक मदत केली होती.
- बिग बी म्हणतात की, 'आपल्या देशासाठी शहीद होणा-या जवानांच्या कूटूंबासाठी काही केल्याने मला समाधान मिळते. अखेर ते जवान आपल्यासाठी आयुष्याची कुर्बानी देतात.'
भारतातील सर्वात पावरफुल व्यक्ती आहेत बिग बी
- आंतरराष्ट्रीय डेटा एनालिटिक्स कंपनी यूगोवने भारतातील प्रभावशाली व्यक्तींचा एक ऑनलाइन सर्व्हे केला होता. या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन पहिल्या नंबरवर आहेत.
- कंपनीने या सर्वेमध्ये बॉलिवूड आणि क्रिडा क्षेत्रातील 60 व्यक्तीचे नाव दिले होते. देशातील 1,948 लोकांनी या सर्वेमध्ये आपले मत नोंदवले होते.
ही आहे पुर्ण लिस्ट
- यूगोवच्या लिस्टमध्ये बिग बीनंतर दूस-या नंबरवर दीपिका पादुकोण आहे. तिस-या नंबरवर कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आणि तौथ्यानंबरवर सचिन तेंडूलकर, 5 व्या नंबरवर अक्षय कुमार नंतर विराट कोहली आहे.
- लिस्टमध्ये आमिर खान 7 व्या स्थानी, शाहरुख 8 नंबरवर, आलिया नवव्या स्थानी तर प्रियांका चोप्रा 10 नंबरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.