आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरे कॉलनीत वृक्षांची कत्तल: ज्या तत्परतेने अधिकारी काम करत आहेत त्यांना पीओकेवर पाठवायला हवे -आदित्य ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आरे कॉलनीत मेट्रो कार शेडसाठी 2700 वृक्षांच्या कत्तलीचे काम शुक्रवारी रात्री उशीरा सुरू करण्यात आले आहे. पर्यावरणवाद्यांसह युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी याचा कडवा विरोध केला. आदित्य ठाकरेंच्या मते, मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांनी आरे कॉलनीत वृक्षतोडीसाठी अधिकारी पाठवण्यापेक्षा त्यांना पीओकेवर पाठवावे. त्यांना दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे काम द्यावे. मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी वृक्षतोडीच्या विरोधात आलेल्या याचिका फेटाळून बीएमसीला झाडांच्या कत्तलीची परवानगी दिली.

 

अतिशय लज्जास्पद  -आदित्य ठाकर


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ट्विटरवर लिहिले, "ज्या तत्परतेने मुंबई मेट्रोचे अधिकारी आरे कॉलनीतील पर्यावरण नष्ट करण्याच्या कामात लागले आहेत ते अतिशय लज्जास्पद आहे. या अधिकाऱ्यांना तर पाकव्याप्त काश्मिरात तैनात करायला हवे. यांना झाडांची कत्तल नको तर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम द्यायला हवे." पर्यावरणवादी आणि शिवसैनिक ही वृक्षतोड रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वन नष्ट केले जात आहे. मुंबईत मेट्रोसाठी ती प्रत्येक गोष्ट नष्ट केली जात आहे जे भारताने यूएनमध्ये म्हटले होते. असेही ठाकरेंनी ठणकावले.