आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशराज फिल्मविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल, 100 कोटी लाटल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रसिद्ध चित्रपट निर्माती कंपनी यश राज फिल्म आणि त्याच्या संचालकांविरूद्ध मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी(आयपीआरएस)कडून संगीताची रॉयल्टी म्हणून 100 कोटी रुपये घेतल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. आयपीआरएसने अलीकडेच ईओडब्ल्यूसोबत मिळून यशराज विरोधात तक्रार दाखल केली. यश राज फिल्म्सने दूरसंचार कंपन्या, रेडिओ स्टेशन्स आणि म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन रॉयल्टी गोळा करू न दिल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. दाखल केलेल्या तक्रारीत यशराज फिल्मचे संचालक अदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या नावाचा समावेश आहे. तक्रारदाराने असा दावा केला आहे की, आयपीआरएसचाकडे कलाकार आणि संगीतकारांच्या वतीने रॉयल्टी गोळा करण्याचा अधिकार आहे, परंतु यशराजने त्यांना तसे करू दिले नाही आणि अनधिकृतपणे ती रॉलल्टी गोळा केली. यशराजविरोधात कलम 409 आणि 34 अंतर्गत कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 

बातम्या आणखी आहेत...