मुंबई / मुसळधार पावसामुळे मुंबईतील एका इमारतीला आले धबधब्याचे स्वरुप; व्हिडिओ आला समोर

इमारतीवरून कोसळणारे पाणी पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी 
 

दिव्य मराठी वेब

Sep 05,2019 10:58:00 AM IST

मुंबई - मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील एक 40 मजली इमारतीला धबधब्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. छतावर साचलेले पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली पडत होते. यामुळे हे दृश्य एखाद्या धबधब्यापेक्षा कमी नव्हते.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये इमारतीच्या छतावरुन पाणी खाली कोसळताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही 40 मजली इमारत मुंबईच्या कफ परेड भागात आहे. इमारतीवरून पडणारे पाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.


लोक म्हणाले - याला पर्यटन स्थळ बनवा
सदरील व्हिडिओ ट्वीटरपर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी याची खिल्ली उडवली तर काहींनी याला गांभीर्याने घेतले. या इमारतीला पर्यटन स्थळ बनवा आणि त्यासाठी तिकीट ठेवा असे एका युझरने म्हटले. तर एका महिलेने याला गांभीर्याने घेत विचारले की, खरंच हा कफ परेड भाग आहे का? असे कसे होऊ शकते. तर इमारतीत राहणाऱ्या रोहनने सांगितले की, मी या इमारतीच्या 32 व्या मजल्यावर राहतो. आमच्या इमारतीवरून एखादा धबधबा पडत असल्यासारखे वाटत होते.

X
COMMENT