आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत गँगरेप झालेल्या जालन्यातील 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मात्र बलात्कारी नराधम अद्यापही मोकाटच, राज्यभर संताप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत गँगरेप झालेल्या जालन्यातील 19 वर्षीय तरुणीचा औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि.28) रात्री मृत्यू झाला. तिच्यावर दीड महिन्यांपूर्वी चुनाभट्टी पोलिस ठाणाच्या हद्दीत सामुहिक बलात्कार झाला होता. परंतु बलात्काऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. यामुळे मृत तरुणीच्या नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत त्यांनी चुना भट्टी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले.   
 

निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा 
या सामुहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आज चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा घेऊन धडकणार आहे. तरुणीने महिनाभर मृत्यूशी दिलेली झुंज अखेर संपली. या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रा.काँ मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर लाला डोंगर ते चुनाभट्टी असा मोर्चा काढला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...