आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवस अंधार, मारहाण, जेवणाची अाबाळ, जिवंत राहण्याची शाश्वतीच नव्हती; अामचा पुनर्जन्मच झाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चार दिवस अंधार, मारहाण, जेवणाची अाबाळ, जिवंत राहणार की नाही याची शाश्वती नाही, अशा कठीण प्रसंगांचा सामना करत मलेशियातल्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका हाेऊन डाेंबिवलीतील काैस्तुभ अाणि राेहन वैद्य हे बंधू अापल्या घरी सुखरूप पाेहोचले. अामचा पुनर्जन्मच झाला, अशी भावना व्यक्त करत त्यांनी अपहरणनाट्याचा शनिवारी उलगडा केला.

 

डाेंबिवली पूर्वेतील एमअायडीसी भागात राहणारे वैद्य बंधू यांचा मांस निर्यातीचा व्यवसाय असून त्यांची राॅक फ्राेझन नावाची कंपनी अाहे. गेल्या तीन वर्षांपासून दाेघेही या व्यवसायात कार्यरत अाहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते नेहमीच मलेशिया, व्हिएतनाम देशांचा प्रवास करत असतात. २ अाॅगस्ट राेजी मलेशियातील मिस ली फ्राेझन या कंपनीबराेबर व्यवसायाची बाेलणी करण्यासाठी मलेशिया येथे गेले असता १ काेटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात अाले हाेते. तब्बल चार दिवसांनंतर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर ते शुक्रवारी संध्याकाळी अापल्या घरी परतले. अपहरणनाट्याचा उलगडा करताना दाेन्ही बंधू म्हणाले, अाम्ही १ अाॅगस्टला मलेशिया येथे पाेहोचलाे. ग्रँड अाॅरचर्ड हाॅटेलमध्ये अाम्ही थांबलाे हाेताे. ठरल्याप्रमाणे अामची दाेन अाॅगस्टला मिस ली फ्राेझन कंपनीबराेबर व्यवसायासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर रात्री अाठ वाजता लॅक किन्स फूड या कंपनीबराेबर बैठक ठरली हाेती. त्या कंपनीने अाम्हाला घेण्यासाठी गाडी पाठवली. त्यांच्या गाडीत बसून अाम्ही दाेघे निघालाे. जवळपास ४५ मिनिटांच्या प्रवासात अाम्हाला अाजूबाजूला खूप झाडे दिसली, पण परिसर कळत नव्हता. थाेड्या वेळात  अाणखी एक गाडी अामच्यासमाेर अाली. अामचा ड्रायव्हर मग त्या माेटारीच्या मागे अामची गाडी चालवू लागला. त्या वेळीच अामच्या डाेळ्यावर पट्टी बांधून अाम्हाला मारहाण करण्यात अाली. डाेळ्यावर पट्टी असल्याने अापण कुठे अाहाेत हे कळले नाही. त्याचप्रमाणे अपहरणकर्ते काेण अाहेत हेदेखील समजू शकले नाही, असेही  दोघांनी या वेळी सांगितले.

 

व्हाॅट्सअॅपने केला घात  
लॅक किन्स कंपनीविषयी काेणतीच माहिती नाही. व्हाॅट्सअॅपवरील मेसेजनुसार बैठक ठरली. अामच्या व्यवसायात ईमेल, व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातूनच अनेक बैठका झाल्या अाहेत. त्याचप्रमाणे ही बैठक ठरली हाेती.  पण यापुढे मात्र पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय बाेलणी करायची नाही, असा निर्णय घेतला अाहे. एक काेटी रुपयांची खंडणी दिली नाही. मात्र, अपहरणकर्त्यांनी डेबिट अाणि क्रेडिट कार्डांमधून ६६ हजार रुपये काढले.

बातम्या आणखी आहेत...