आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Serial Blast Yakub Memon Hanging With Death

याकूबला फाशीच हवी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"फाशीचे कवित्व' हे २३ जुलै रोजी प्रसिद्ध झालेले संपादकीय वाचले. शीर्षक समर्पक वाटते. याकूबच्या फाशीचे कवित्व अजून रंगतेच आहे. कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी याकूब मेमन याला मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील खटल्यात फाशीची शिक्षा झाली. तब्बल २२ वर्षे इतका प्रदीर्घ काळ खटला चालतो आहे. तरी फाशी देण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी अजूनही प्रलंबितच आहे. ज्या क्रूरकर्म्याने एका फटक्यात शेकडो निष्पाप लोकांचे बळी घेतले, त्याला फाशी देण्यात विलंब का लागतो आहे? अजमल कसाब, अफझल गुरूला असेच दीर्घ काळ जिंवत ठेवले होते. यांच्या सुरक्षेवर सरकारचे लाखो रुपये खर्च होतात. न्यायपालिकांनीही निर्णय देण्यास विलंब केल्यास ताेही अन्यायच म्हटला जातो. दाऊद तिकडे गमजा मारतोय. मग अमेरिकेसारखी मुसंडी मारून दाऊदला खतम करण्याचा विचार का करत नाही?
- संदीप वाघमारे, औरंगाबाद