आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा 'पटेलां'सारखा होणार उभा, समुद्रात अश्वारूढ पुतळा टिकणे शक्य नसल्याची संबंधित कंपनीला झाली उशिराने उपरती 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईच्या अरबी समुद्रात बांधण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात पुन्हा मोठा बदल करण्यात येत आहे. नियोजित अश्वारूढ पुतळ्याच्या जागी गुजरातमध्ये उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'च्या धर्तीवर शिवरायांचा उभा पुतळा करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. 

 

प्रकल्पाच्या तांत्रिक समितीची २७ नोव्हेंबर २०१८ रोजी बैठक झाली. त्यात छत्रपतींच्या पुतळ्याच्या तीन नव्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या. त्यातील एक प्रतिकृती गुजरातमध्ये सरदार सरोवराशेजारी वल्लभभाई पटेल (स्टॅच्यू आॅफ युनिटी) यांचा जो उभा पुतळा आहे, त्याप्रमाणेच आहे. या बैठकीत प्रकल्प सल्लागार कंपनीने (इंजिज इंडिया) उभ्या पुतळ्याची शिफारस केली आहे. बैठकीत चर्चा झाली, पण निर्णय झाला नाही. 'अश्वारूढ पुतळा समुद्रात टिकाव धरू शकणार नसल्याचे कंपनीचे मत आहे. त्यामुळे तांत्रिक समितीसमोर पुतळ्यात बदल करण्याशिवाय पर्याय नाही. पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेऊ शकते,' असे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले. 


स्मारकाचे जलपूजन झाले, निविदा निघाल्या, करार झाले, कार्यारंभ आदेश काढला, पायाभरणी झाली आहे. त्यानंतर स्मारकाच्या पुतळ्यात बदल करण्यात येत असल्यामुळे प्रकल्पाची मालकी असलेला राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्मारकाच्या समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. 

 

शिवरायांचे नियोजित स्मारक २१२ मीटर (१२३.२ मीटर पुतळा, ८८.८ मीटर चबुतरा) उंच आहे. पण, हवेत उंच धरलेली अश्वारूढ पुतळ्याची तलवार समुद्रातील वेगवान वाऱ्यापुढे टिकाव धरू शकणार नसल्याची सल्लागार कंपनीला भीती आहे. दरम्यान, पुतळ्याचे काम आंतरराष्ट्रीय शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आले असून २०१६ पासून त्यांनी अभ्यास सुरू केला आहे. 

 

सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा उंच ? 
सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आॅफ युनिटी १८२ मीटर (पुतळा १५२ मीटर, चबुतरा ३० मीटर) उंच आहे. शिवस्मारक २१२ मीटर (उभा पुतळा १५३ मीटर, चबुतरा ५९ मीटर) उंच केला जाऊ शकतो. त्यामुळे महाराजांचा पुतळा पटेलांच्या पुतळ्यापेक्षा उंच केल्याचे श्रेय फडणवीस सरकारला घेता येणार आहे. 'शिवस्मारकाच्या मूळ प्रतिकृतीत पुतळ्याच्या अश्वाचे दोन पाय वर आहेत. नव्याने तीन प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत, त्यात अश्वाचा एक पाय हवेत, चारही पाय जमिनीवर आणि एकट्या शिवरायांचा उभा पुतळा यांचा समावेश आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...