Home | Maharashtra | Mumbai | Mumbai stand still due to heavy rains 2 july 2019 news and updates

मुंबई ठप्प: हवाई पट्टीवरून विमान घसरले; शाळा, महाविद्यालयांसह कार्यालयांना सुट्टी, बचाव कार्यासाठी नौदल तैनात

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 02, 2019, 03:22 PM IST

धावपट्टीवरून घसरले स्पाईस जेटचे विमान, अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा

 • मुंबई - मुंबईत सलग पाचव्या दिवशी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच अत्यावश्यक काम असल्याशिवाय मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने मंगळवारी जारी केले आहेत. एवढेच नव्हे, तर मुंबई, ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा, महाविद्यालयांसह कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांतच मुंबईत तब्बल 21 इंच पाऊस पडला. अनेक ठिकाणी 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे एक विमान हवाई पट्टीवरून घसरल्याने मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. मुंबईत बचावासाठी नौदलाचे पथक कार्यरत करण्यात आले आहे. तसेच ठिक-ठिकाणाहून 1000 नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले आहे.

  विमानतळाचा मुख्य रनवे बंद
  मुसळधार पावसामुळे विमानतळावर पाणी साचले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जूहू विमानतळावरील पाण्यात मासे देखील दिसून आले. अशात जयपूरहून मुंबईला पोहोचलेले स्पाइसजेटचे विमान एसजी 6237 मंगळवारी रात्री रनवेवरून घसरून बाजूला गेला. त्यामुळे, मुख्य रनवेवरील विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. लॅन्डिंग आणि टेक-ऑफसाठी पर्यायी रनवे वापरले जात आहेत. स्पाइसजेट विमान घसरल्यानंतर 54 हून अधिक विमान इतरत्र वळवण्यात आले आहेत. आता मुंबईला येणारे काही विमान अहमदाबाद आणि बेंगळुरूला डायव्हर्ट झाले आहेत. विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्या सोशल मीडियावर आपल्या प्रवाशांना आणि ग्राहकांना अपडेट्स देत आहेत. विस्तारा आणि इंडिगो एअरलाइन्सने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

  मातोश्रीजवळही पाणीच-पाणी, आदित्य ठाकरेंना नेण्यासाठी बोलवावे लागले नगरसेवक

  मुंबईच्या पावसाचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर येथील नेत्यांना सुद्धा बसला आहे. शिवसेनेचे मुख्यालय मातोश्री परिसरात सुद्धा पाणी साचल्याने आदित्य ठाकरे यांना बाहेर पडणे कठीण झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, शिवसेनेच्या नगरसेवकांनी घटनास्थळी पोहोचून आदित्य ठाकरेंना बाहेर येण्यात मदत केली. यानंतर आदित्य ठाकरे महापालिकेच्या आपातकालीन कक्षात पोहोचले. तसेच मुंबईच्या पाऊस परिस्थितीचा आढावा घेतला.

 • Mumbai stand still due to heavy rains 2 july 2019 news and updates
 • Mumbai stand still due to heavy rains 2 july 2019 news and updates
 • Mumbai stand still due to heavy rains 2 july 2019 news and updates
 • Mumbai stand still due to heavy rains 2 july 2019 news and updates
 • Mumbai stand still due to heavy rains 2 july 2019 news and updates

Trending