दर घटल्याने शेअर बाजारात मजबूती
खरेदीच्या बळावर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत आल्याचे चित्र होते.
-
मुंबई - एल ऍण्ड टी या ब्ल्यू चीप कंपनीचे तिमाही आणि वार्षिक निकाल नुकतेच घोषित झाले आहे. या निकालानुसार खरेदीच्या बळावर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत आल्याचे चित्र होते.
खाद्यान्नाच्या कमी होत असलेला दर आणि विदेशी बाजारातील वृद्धीचादेखील शेअर बाजाराला फायदा झाला आहे. गुरुवारीची वृद्धी कायम राखत मुंबई स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) ३ शेअर्सचा निर्देशांक शुक्रवारी १८४ अंकांसह १.२ टक्क्यांनी उसळून १८,३२६.९ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या ५ शेअर्सचा निफ्टीदेखील शुक्रवारी ५८.२५ अंकांनी उसळून त्यात १.७ टक्क्यांची वाढ झाली आणि व्यापाराच्या शेवटच्या सत्रात तो ५,४८६.३५ अंकांवर पोहोचला. महिन्याच्या सुरुवातीला महागाईचा दर कमी झाल्याचे आढळून आल्याने गुंतवणुकदारांचे मनोबल वाढले आहे,असे शेअर व्यापा:यांनी म्हटले आहे. मागील ७ मे रोजी समाप्त आठवड्यादरम्यान खाद्यपदार्थांचा महागाई दर ७.४७ टक्क्यांवर आला होता. मागील १८ महिन्यांतील महागाईचा हा सर्वात कमी दर आहे. सरकारने तेल विपणन कंपन्यांवर सबसिडीचे ओझे लादले नसते तर बाजार आणखी मजबूत स्थितीत आला असता असे ब्रोकर्सनी म्हटले आहे. तेल कंपन्यांवर शासनाने सबसिडी लादल्यानंतर बाजारात निराशा दाटली, असे आयआयएफएलचे संशोधन प्रमुख अमर अंबानी यांनी म्हटले आहे. पण एल अॅण्ड टीच्या निकालाची धुंदी अजून बाजारात टिकून आहे.
त्यातच खाद्यान्न महागाईचा दर घटल्यानेही गुंतवणुकदारांना परत विश्वास मिळाला आहे. विदेशी भांडवल बाजारात दिसून आलेल्या सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत कमोडिटीच्या किमतीत झालेली घट यामुळेही भारतीय गुंतवणुकदारांचा विश्वास वाढत आहे. शुक्रवारी निर्देशांकाच्या बांधणीत सर्वात जास्त वाटा एल ऍण्ड टीच्या शेअर्सचा राहिला. गुरुवारी घोषित सर्वोत्तम तिमाही निकालाच्या आधारावर निर्देशांक ३.५७ टक्क्यांनी उसळला. यामध्ये सिप्ला (३.२२ टक्के), बजाज (३.५ टक्के), टाटा स्टील (२.७६ टक्के) आणि आरईएल इन्फ्रा (२.७३ टक्के) यांचाही बाजाराला मजबूत स्थितीत आणण्यात वाटा राहिला. तथापि देशातील सर्वात मोठी कर्जदाती एसबीआय मात्र याबाबतीत दुर्दैवी ठरली. एकूणच निर्देशांक सकारात्मक दिशेने पुढे सरकला. बाजारातील ३ पैकी २७ स्टॉक वृद्धी गाठण्यात यशस्वी ठरले. इंडेक्सच्या बाबतीत १३ पैकी ११ क्षेत्रांनी बाजार बंद होताना वृद्धी गाठली. यामध्ये कॅपिटल गुडस (२.३१ टक्के), ऑटो (१.३७ टक्के) आणि बीएसई-एचसी (१.३४ टक्के)
यांना गुंतवणुकदारांचा चांगला पाठींबा मिळाला. शेअर बाजारातील एकूण स्टॉक्सच्या तुलनेत करता १,५३४ स्टॉक्स वृद्धी गाठुन बंद झाले पण १,२८६ ना मात्र नुकसान झाले. दुपारी सीएमसीत .४७ टक्के, इनडॅक्स मध्ये .२३ टक्के आणि ईटीएसईमध्ये .६५ टक्के वृद्धी झाली.