Home | Business | Gadget | Mumbai Teen Tracks Down Man Who Stole Her Android Smartphone

मुंबईच्या 19 वर्षीय तरुणीने असा शोधला हरवलेला Smartphone, कामाची आहे ही Trick

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 10, 2018, 12:07 AM IST

19 वर्षीय तरुणीने शोधला चोरी झालेला स्मार्टफोन, चोर शहर सोडून जाणार तोच पोलिसांसह पोहचली त्याच्या ट्रेन बर्थपर्यंत.

 • Mumbai Teen Tracks Down Man Who Stole Her Android Smartphone
  चोरांना शोधणारी झीनत.

  गॅझेट डेस्क - मुंबईची 19 वर्षीय तरुणी झिनत बानो हिने तिचा चोरी झालेला स्मार्टफोन स्वतःच शोधला. ती चोरी झालेला फोन दुसऱ्या फोनवरून ट्रॅक करत होती. असे करताना ती थेट चोरापर्यंत पोहोचली. सेलवाराज शेट्टी नावाच्या व्यक्तीने झीनतचा फोन चोरला होता. तो शहर सोडून पळणार होता, पण झीनतने रेलवे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या मदतीने त्याला पकडले.


  मालाडमध्ये झाली चोरी
  झीनत शेजारच्या एका शाळेत शिक्षिका आहे. रविवारी ती कामानिमित्त मालाडला गेली होती. परतताना तिचा स्मार्टफोन चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. पण फोन कधी कुठे चोरीला गेला हे तिला कळले नाही. त्यानंतर तिने गुगलच्या मदतीने फोन शोधला.


  फोन अॅक्टीव्हिटी केली ट्रॅक
  झीनतने सांगितले की, तिने दुसऱ्या फोनवरून तिच्या गुगल अकाऊंटने लॉगीन केले. तसेच फोन अॅक्टीव्हिटीवर नजर ठेवली. तेव्हा तिला समजले की, सेलवाराज शेट्टीने फोनवर रजनिकांतच्या काला चित्रपटाचे गाणे सर्च केले. शेअरइट अॅप यूझ केले, व्हाट्सअप, मॅसेंजर आणि फेसबूक अपडेट केले. तसेच रेल्वे तिकिट बुकींग अॅप डाऊनलोड केले.


  असा पकडला गेला चोर
  झीनतने GPF ला सर्व सांगत या व्यक्तीने दादर ते तिरुवंतमलईचे रेल्वे तिकिट बूक केल्याचे सांगितले. त्याचा स्क्रीनशॉटही घेतला. चोरने मोबाईलवर फोटोही काढला होता. तिने गुगल फोटोजमधून त्या व्यक्तीचे रेल्वे तिकिट आणि इतर डिटेल्स घेतले. इंटरनेटवरून रेल्वेची माहिती घेतली. तर त्याची रेल्वे रविवारी रात्री 9:30 वाजता दादरहून निघणार होती, हे त्याला समजले. चोर दादर स्टेशनवर एका पुलावरून आला होता. GRP त्याठिकाणी पोहोचले पण चोर सापडला नाही. रेल्वे आल्यानंतर RPF तिकिटाच्या सीट नंबरवर पोहोचले, तर त्याठिकाणी आलेल्या व्यक्तीकडे चोरी केलेला मोबाईल सापडला.


  काय आहे My Activity?
  अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांना गुगल अकाऊंट तयार करावे लागते. त्या अकाऊंटच्या मदतीने फोनमध्ये अॅप इन्स्टॉलेशनसह इतर कामे होतात. फोनमध्ये अकाऊंट लॉग इन केल्यापासून तुमची अॅक्टिव्हीटी सेव्ह होत असते. तुम्ही काय डाऊनलोड केले? काय सर्च केले? कोणते गाणे व्हिडिओ पाहिले? तुमचे लोकेशन कोणते होते? असे सर्व रेकॉर्ड होते. यात क्रोम, अँड्रॉइड, सर्च, अॅड, इमेज सर्च, गूगल न्यूज अशा विविध कॅटेगरी असतात. यूझरला ही अॅक्टीव्हिटी डिलिटही करता येते.


  Find your phone चा वापर करा
  गूगलवर Find your phone सर्च करा. याठिकाणी जी पहिली लिंक येईल ती ओपन करा. तुमच्या हँडसेटचे मॉडेल दिसेल. याठिकाणाहून तुम्ही फोनचे लोकेशन शोधू शकता. त्यासाठी GPS ऑन असायला हवे. पासवर्ड टाकून लॉकही करता येतो. फोन शोधण्यासाठी 'This phone is lost. Please help give it back' मॅसेज टाकून दुसरा क्रमांकही देऊ शकता. फोनचा डाटाही तुम्हाला येथून डिलिट करता येतो.

 • Mumbai Teen Tracks Down Man Who Stole Her Android Smartphone
  गुगलच्या माय अॅक्टिव्हिटीच्या आधारे शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन
 • Mumbai Teen Tracks Down Man Who Stole Her Android Smartphone
  गुगलच्या माय अॅक्टिव्हिटीच्या आधारे शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन

Trending