Home | International | Other Country | mumbai terror attack case tahauuar rana in shicogo court

अमेरिकेत राणावरील खटला सुरु

Agency | Update - May 20, 2011, 12:32 PM IST

राणा याच्या खटल्यावरील सुनावणीस अमेरिकेतील न्यायालयात सुरवात झाली आहे.

  • mumbai terror attack case tahauuar rana in shicogo court

    शिकागो - मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याच्या खटल्यावरील सुनावणीस अमेरिकेतील डर्कसन फेडरल न्यायालयात सुरवात झाली आहे.

    या खटल्याच्या सुनावणीच्या सुरवातीच्या टप्प्यात न्यायाधीश आरोपांच्या निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. तहव्वूर राणा हा शिकागो येथील व्यावसायिक असून, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात त्याने डेव्हिड हेडलीला सहकार्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
    जिल्हा न्यायाधीश हॅरी लेनिन वेबर राणाची तपासणी करणार असून, तपासणीचे कामकाज आठवडाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही पक्ष आपापल्या बाजू मांडणार आहेत.

    या खटल्यात आरोपी राणाची बाजू वकील पॅट्रिक ब्लेगन आणि चार्ली स्विफ्ट हे मांडणार आहेत.

Trending