• Home
  • International
  • Mumbai terror attack mastermind Jamaat ud Dawah Hafiz Saeed's joins hands with fringe groups

International Special / तुरुंगात असूनही हाफिज सईदच्या सुरू आहेत दहशदवादी कारवाया, दुसऱ्या दहशदवादी संघटनांशी हात मिळवणी करुन रचत आहे भारतावर हल्ला करण्याचा कट


एफएटीएफच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने दहशदवादी संघटनांवर कारवाई केली

दिव्य मराठी

Aug 12,2019 06:06:00 PM IST

इस्लामाबाद(पाकिस्तान)- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दावा’ संघटनेवर निर्बंध लावले, त्यानंतर हाफिजने भारत आणि इतर ठिकाणांवर दहशदवादी कारवाया करण्यासाठी इतर दहशदवादी संघटनांशी हातमिळवणी केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लश्कर-ए-तैयबाची सहयोगी संघटन "जमात-उद-दावा" टेरर फंडिंग आणि मनी लॉड्रिंग करण्यासाठी इतर संघटनांशी हातमिळवणी करत आहे.


हाफिज मोहम्मद सईदला काही दिवसांपूर्वीच गुजरांवाल पोलिसांनी टेरर फंडिंगच्या आरोपात अटक केली. हाफिजला अटक आणि त्याच्या संघटनावर निर्बंध लावण्याची कारवाई, पॅरिसची आर्थिक संस्था फायनांशिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या इशाऱ्यानंतर करण्यात आली. एफएटीएफने सांगितले की, पाकिस्तानने जर दहशदवाद्यांविरुद्ध कारवाई केली नाही, तर त्यांना ब्लॅख लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. जर पाकिस्तान ब्लॅक लिस्टमध्ये सामील झाला, तर त्याला आयएमएफ, जागतिक बँक, एडीबी, ईयूसारख्या संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळणे बंद होईल.


पाक 2018 मध्ये दुसऱ्यांदा "ग्रे लिस्ट" मध्ये आला
एफएटीएफने जून 2018 मध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले. त्याआधी 2012 मध्येही पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. पाकवर आरोप होता की, त्यांनी दहशदवाद्यांना आर्थिक साहाय्य आणि मनी लॉड्रिंग करण्यासाठी मदत केली.


अमेरिकेने सईदला जागतिक दहशदवादी घोषित केले
रिपोर्टनुसार- सईदची संघटना "जमात-उद-दावा" ला "लश्कर-ए-तैयबा" मुख्य चेहरा मानले जाते. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईद होता. अमेरिकेने सईदला जागतीक दहशदवादी घोषित केले आहे आणि त्यावर 10 मिलिअन अमेरिकी डॉलरचे बक्षीसही जाहीर आहे.

X