आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक व्यक्ती लेडीज हॉस्टेलच्या मागच्या गेटने करत होता प्रवेश, लेडी सिक्युरिटी गार्डची नजर पडताच गार्डवर केला चाकूने हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील लेडीज हॉस्टेलच्या महिला सिक्युरिटी गार्डला एका व्यक्तीने चाकूने हल्ला करून रक्तबंबाळ केल्याची घटना घडली आहे. गोंधळाचा आवाज ऐकू आल्यानंतर मुली आपल्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांना महिला गार्ड रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मुलींना बघताच हल्लेखोर पळ काढण्याच्या तयारीत होता. मुलींना चाकूचा धाक दाखवत तेथून पळण्याचा प्रयत्न करत असताना मुलींनी धैर्य दाखवत त्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतले.   

पोलिसांच्या म्हणण्यानूसार,  सोमवारी रात्री उशिरा ठाण्याच्या खोपट भागातील राजीव गांधी मेडीकल कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये महिला गार्ड कामावर होती. या दरम्यान, आरोपी इमारतीच्या मागच्या बाजूने आत आला आणि त्याने महिला गार्डवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीने महिलेवर केलेल्या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत हल्लेखोराची चौकशी सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...