आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24X7 खुली राहणार मुंबई! आदित्य ठाकरेंच्या प्रस्तावाला महाराष्ट्र कॅबिनेटची मंजुरी; 27 जानेवारीपासून लागू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र कॅबिनेट 24 तास मुंबई खुली ठेवण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली आहे. यामध्ये बिगर रहिवासी परिसर अर्थात बीकेसी, नरिमन पॉइंट असे ठिकाण आठवड्यातील 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास खुले ठेवले जाणार आहे. येत्या 27 जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दुकाने, उद्योग 24X7 सुरूच ठेवावे असे कुणावरही बंधन नाही


लंडनची रात्रीची उलाढाल 5 अब्ज पौंड अर्थात जवळपास 5 लाख कोटी रुपयांची आहे. याच शहराचा आदर्श घेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव मांडला होता. या निर्णयानंतर राज्याला पर्यटनाच्या माध्यमातून अधिकाधिक कमाई करण्यात मदत मिळेल. सोबतच, रोजगाराच्या संधी आणि छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना उत्पन्नाच्या संधी वाढतील अशी माहिती कॅबिनेटच्या निर्णयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी दिली. सोबतच, सर्वांनी नाइट लाइफमध्ये शॉपिंग मॉल, खाऊ गल्ली, स्टॉल किंवा इतर दुकाने सुरूच ठेवावीत असे काहीही बंधन नाही.


या निर्णयानंतर पहिल्या टप्प्यात रहदारीच्या ठिकाणी नसलेली दुकाने, खाऊ गल्ल्या आणि मॉल तसेच कमपाउंडमध्ये असलेले सिनेमागृह यांना परवानगी दिली जाणार आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नरिमन पॉइंटसह एनसीपीए इत्यादी ठिकाणी एक बाजू फूड ट्रक्ससाठी दिली जाणार आहे. या फूड ट्रक्स आणि स्टॉल्सवर जेवणाचा दर्जा तपासण्यासाठी फूड इंस्पेक्टर तैनात केले जाणार आहेत. घाण-कचरा आणि वेस्ट मॅनेजमेंट संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशा लोकांवर कायमची बंदी घालण्याचा देखील विचार केला जात आहे.

पोलिसांचे काय? बार पब सुद्धा सुरू राहणार?


आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, यात पोलिसांवर दबाव टाकला जाणार नाही. रात्री 1.30 वाजेनंतर शहरात कोणती दुकाने, हॉटेल बंद झालेली नाहीत हे पाहणे आतापर्यंत त्यांची जबाबदारी होती. पण, यापुढे नाइटलाइफमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवणे हे त्यांचे काम असणार आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, या निर्णयात अबकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. सोबतच, बार आणि पब अजुनही रात्री 1.30 वाजल्यानंतर बंद केले जातील. नाइटलाइफमध्ये लोकांनी खाण्याचा आस्वाद घ्यावा, चित्रपट पाहावे.

भाजपच्या नाइटलाइफवरील टीकेवर म्हणाले...


मुंबई काही पहिल्यांदाच 24 तास खुली राहणार असे नाही. यापूर्वीही अनेक मुंबईकर रात्रीच्या वेळी काम करतात. पर्यटक प्रवास करत असतात. अशात रात्री 10 वाजल्यानंतर भूक लागल्यास त्यांनी जायचे कुठे? नाइटलाइफमध्ये सुरक्षेसाठी ठिक-ठिकाणी सीसीटीव्हींची पाळत ठेवली जाणार, जे मॉल आणि दुकाने नाइटमध्ये काम करतील त्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहेत का याची देखील तपासणी केली जाणार आहे. ज्यांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त हवा असेल ते यासाठी पैसे देऊन मागणी करू शकतील. दरम्यान, भाजपकडून नाइट लाइफवर आरोप होत असताना त्यावर उत्तर देताना भाजप युवा पिढीच्या विरोधात आहे. त्यामुळेच, ते विद्यार्थ्यांना कसे हाताळतात हे सर्वांना दिसून आले. असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...