आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईवरून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस रुळावरून घसरली, कोणतीही जीवितहानी नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई सीएसटीएमवरून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस पटरीवरुन उतरल्याची घटना घडली. नाशिकजवळील कसारा आणि इगरपूरी स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाहीये. पाहाटे 3.50 वाजता हा अपघात झाला. तुर्तास तीन लाइनपैकी दोनवर वाहतूक सुरळीत सुरू आहे असे सेंट्रल रेल्वेने सांगितले आहे.

 

अंत्योदय एक्सप्रेस रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सीएसटीवरून निघाली. कसारा घाटात ट्रेन आल्यावर अचानक जोरदार आवाज अला आणि ट्रेन थांबली. यावेळी झोपेत असलेले सर्व प्रवासी घाबरून जागे झाले. ट्रेनमध्ये प्रवास करत असलेले राधेश्याम चौधरी यांनी सांगितले की, पटरीवरून घसरल्यावर ट्रेनला इमरजन्सी ब्रेक लावून थांबवण्यात आले. 


ज्या ठिकाणी अपघात झाला, तो कसारा घाटाचा ब्रीज आहे. थोडे जरी इकडे-तिकडे झाले असते तर मोठा अपघात झाला असता. हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता. या अपघातामुळे दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान पटरीवरून घसरलेल्या डब्ब्यांना परत पटरीवर ठेवून पुढील स्टेशनकडे रवाना करण्यात आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...