Home | Editorial | Columns | mumbai-up-bihar-migrated

मुंबईतील लोंढे गेले रे गेले...

शेखर देशमुख | Update - May 31, 2011, 05:10 PM IST

दोन वर्षांत मुंबई-नाशिक-पुणे येथील महापालिका निवडणुकांदरम्यान परप्रांतीयद्वेषही उफाळून येऊ शकतो. मात्र, आता 'लोंढे आले रे आले...'ची प्रादेशिक पक्षांची राजकीय थाप पूर्वीइतकी पचणार नाही.

 • mumbai-up-bihar-migrated

  ताज्या प्राथमिक जनगणना अहवालानुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येत (११ कोटी) दोन कोटींहून अधिक भर पडली असली तरीही, मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या एक कोटी १९ लाखांवरून एक कोटी २४ लाख अशी नोंदली गेली आहे. म्हणजेच २१ च्या तुलनेत मुंबईच्या लोकसंख्येत पाच लाखांची (वर्षाला २ हजार या दराने चार टक्के) वाढ झाली आहे. यात असेही निरीक्षण मांडण्यात आले आहे की, गेल्या दशकात मुंबईतल्या लोकसंख्येत ५.७५ टक्के, तर उपनगरात ८.१ टक्के दराने वाढ झाली.
  दोन वर्षांपूर्वी 'फायनान्शियल टाइम्सऍ'ला दिलेल्या एका मुलाखतीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत दररोज ३५ ते ४ कुटुंबे स्थलांतर करत असल्याचा दावा केला होता. वस्तुस्थिती तशी असती तर अगदी 300च्या हिशेबाने जरी म्हटले तरी, वर्षाला एक लाख ९५ कुटुंबे मुंबईत यायला हवी. सरासरी तीन जणांचे एक कुटुंब असे गृहित धरले तरीही वर्षाला तीन लाख २८ हजार ५ जणांची, म्हणजेच दहा वर्षांत जवळपास ३ कोटीहून अधिक लोकांची मुंबईच्या लोकसंख्येत भर पडायला हवी होती. पण तसे घडलेले नाही.
  वस्तुत: २१ च्या जनगणना अहवालानुसार मुंबईतल्या स्थलांतरितांमध्ये सगळ्यांत जास्त म्हणजे ३७.४ टक्के प्रमाण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्थलांतरितांचेच होते. त्या खालोखाल उत्तर प्रदेश (२४.३ टक्के), गुजरात (९.६ टक्के), बिहार (३.५ टक्के) आदी राज्यांतून आलेल्यांची टक्केवारी होती. म्हणजेच आजवर मराठी-अमराठी मुद्यावरून अर्धवट सत्य स्थानिकांपुढे मांडून मतांचा डाव टाकला जात होता. १९९१ ते २१ या कालावधीत (९९ लाख २५ हजार ८९१ वरून १ कोटी १९ लाख ७८ हजार ४५) मुंबईच्या लोकसंख्येत जवळपास २ कोटी ५२ हजार 559 इतकी भर पडली होती. पण पुढच्या दहा वर्षांत त्यात नाट्यमयरित्या घसरण झाली ही वस्तुस्थिती आहे.
  गालिचा निर्मितीची ओळख हरवलेल्या उत्तर प्रदेशातल्या भदोई जिल्ह्यातल्या घमहापूर गावात आताशा दहा तरुणांपैकी पाच जण केरळात पानाचा ठेला चालवतात, दोघे गोव्यात हॉटेलमध्ये काम करतात, दोघे पोरबंदरला जहाज तोडणी मजूर म्हणून राबतात तर उरलेला नॉएडा-दिल्ली किंवा कोलकाता इथे ड्रायव्हर म्हणून काम करतो. उत्तर प्रदेश-बिहार सीमेवरच्या कुशीनगर जिल्ह्यातले अनेक कर्ते पुरुष मच्छरदाणी विकण्याच्या व्यवसायासाठी थेट बँकॉक गाठतात. मार्बल व्यवसायाचे मोठे केंद्र असलेल्या राजस्थानातल्या किशनगढमधल्या कारखान्यात दहा ते पंधरा हजार मजूर काम करतात. यातले ९ टक्के मजूर उत्तर-प्रदेश बिहारहून आलेले असतात. वास्तविक, गेल्या निवडणुकीत दुसर्यांदा सत्तेवर आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्या राज्यात जे सुधारणांचे वातावरण निर्माण केले, त्यामुळे बिहारमधून मुंबईत येणार्या लोंढ्यांचे प्रमाण किंचित कमी झाले आहे. मुंबईतील महागाई आवाक्याबाहेर चालल्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्येही काही प्रमाणात स्थलांतर होताना दिसते.
  १९९२ पासून जागतिकीकरण आणि खुल्या आर्थिक धोरणांचा होऊ लागला तशी देशभरातल्या लहान-मोठ्या शहरांमध्ये नव्याने उद्योग-धंदे विस्तारायला सुरुवात झाली. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आयटी इंडस्ट्रीशी संबंधित सेवा क्षेत्राचा प्रभाव वाढू लागला. आर्थिक़रीत्या पुढारलेले राज्य म्हणून ख्याती असलेल्या महाराष्ट्राची उद्योग-धंद्यात पीछेहाट सुरू झाली. (राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार २६ ते २९ या कालावधीत राज्यातले ५९ हजार ७९६ लघु उद्योग बंद पडले. याच कालावधीत १ हजार २९३ इतके मोठ्या आणि मध्यम उद्योगांना घरघर लागली. मार्च २१ मध्ये बंद पडलेल्या लघु-उद्योगांची संख्या होती ३१ हजार ९१ तर मोठे व मध्यम उद्योगांची संख्या होती ४१८. त्याच सुमारास उत्तर भारतीय बेरोजगारांमधले महाराष्ट्र आणि मुंबईचे आकर्षणही कमी व्हायला सुरुवात झाली होती. थेट हिमाचल प्रदेशपासून पंजाब-दिल्ली-हरियाणा-गुरगावसारख्या उत्तरेकडच्या भागांकडून कर्नाटक-आंध्र प्रदेश-केरळ या सामाजिक-सांस्कृतिकरीत्या अनोळखी तरीही राजकीय²ष्ट्या तुलनेने सुरक्षित राज्यांकडे स्थलांतरितांनी आपली पावले वळवली होती. एरवी जे राज्य संपन्न, त्या राज्यांकडे कुशल-अकुशल कामगारांच्या स्थलांतराचा वेग वाढता राहणार. मात्र गेल्या दहा वर्षांत उद्योग क्षेत्रातल्या बदललेल्या प्रवाहांनी आणि प्रादेशिक पक्षांच्या हिंसक आंदोलनांनी पारंपरिक मुंबईचे आकर्षण कमी करून स्थलांतराचे प्रवाहसुद्धा बदलून टाकले.

Trending