आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, महिलेने सहाव्या मजल्यावरून मारली उडी; सुदैवाने बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे महिलेचा जीव वाचला आहे. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले आहे. प्रियांका गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयातील आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदरील महिला उल्हासनगर येथील रहिवासी आहे. ती काही कामानिमित्त मंत्रालयात अनेक दिवसांपासून चकरा मारत होती. मात्र अचानक या महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने एकच खळबळ उडाली. सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही महिला पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे नेमके कारण समजू शकले नाही.