आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर(राजस्थान)- संसार चंद्र रोडवरील हॉटल कुबेर पॅलेसमध्ये मागील चार दिवसांपासून राहत असलेल्या तरूणीने सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. जालुपूरा पोलिसांनी मुंबईच्या अंधेरीमध्ये राहणाऱ्या मिराज खातून(28)ला रूग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मरण्यापूर्वी परदेशातील तरूणाला केला होता व्हिडिओ कॉल
मिराज खातूनने आत्महत्या कण्यापूर्वी परदेशात राहणाऱ्या तरूणाला व्हिडिओ कॉल केला होता, ज्याची ओळख काढली जात आहे. मिराज दोन वर्षे रणधीर विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांना तीन वर्षांचा मुलगा देखील आहे, ज्याला दिल्लीच्या एका हॉस्टेलमध्ये ठेवले होते. काही दिवसांपूर्वी रणधीरपासून वेगळे झाल्यावर ती परदेशातील एका युवकाच्या संपर्कात आली होती. 22 मार्चला ती जयपूरच्या हॉटल कुबेरमध्ये थांबली होती. सोमवारी सकाळी 12 वाजेपर्यंत रूमचे दार उघडले नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रूममध्ये गेले असता, त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह मिळाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.