आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधाऱ्या खोलीत तो तिच्या शेजारी येऊन झोपला, तिनेही पती समजून रात्र घालवली; सकाळ होताच ओरडून महिलेचे झाले हाल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच मुंबईच्या एका महिलेने अशी तक्रार केली जी ऐकूण पोलिसही हैराण झाले. तिने सांगितलेल्या घटनेवर सुरुवातीला लोकांना विश्वासच बसला नाही. तिच्या तक्रारीनुसार, घरातील सर्वच कामे आटोपून ती बेडरुममध्ये आली आणि लाइट बंद करून झोपी गेली. यानंतर तिच्या पलंगावर एक पुरुष येऊन झोपला. तो आपला पतीच असल्याचे समजून तिने काहीच विरोध केला नाही. सकाळी सूर्य उगल्यावर खोलीत प्रकाश पडला आणि महिला पाहते काय, तिच्या बेडवर पती नव्हे तर भलताच माणूस होता. 


पोलिसही हैराण...
ही घटना मुंबईतील पवई येथे सप्टेंबरमध्ये घडली आहे. महिलेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, रुमचे लाइट बंद करून ती आराम करण्यासाठी बेडवर पडली होती. त्याचवेळी हलक्या झोपेत असताना विश्वनाथ कोकिन तिच्या रुममध्ये घुसला आणि आंधाराचा गैरफायदा घेत तिच्या बेडवर शेजारीच झोपला. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिला विश्वनाथ आपला पती असल्याचा भास झाला होता. त्यामुळेच, तिने शारीरिक संबंधांना विरोध केला नाही. उलट पती असल्याचे वाटल्याने त्याची आपणही साथ दिली असे ती म्हणाली.


लाइट ऑन करून कपडे घातले, आणि निघून गेला...
महिलेने पुढे सांगितले, की "विश्वनाथने यानंतर भल्या पहाटे रुमची लाइट सुरू केली. तसेच कपडे घालत होता. त्याचा चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन घसरली. मी ज्याला पती समजत होते तो दुसराच निघाला." सकाळीच या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी तक्रार घेऊन आरोपीला अटक केले आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...