आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप्लिकेशन न करता मुंबईच्या विद्यार्थ्याला Google मध्ये मिळाली 1.2 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गूगल, फेसबुक सारख्या बड्या कंपनीत नोकरी करावी, असे बहुतांश उच्चशिक्षित तरुणांचे स्वप्न असते. यासाठी IIT मध्ये अॅडमिशन घेऊन दिवस-रात्र परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, अनेक विद्यार्थी असे असतात की IIT मध्ये(भारतीय प्रौद्योगिकी संस्था) त्यांना अॅडमिशन मिळत नाही. मग काय तर, अशा विद्यार्थ्यांना गूगलसारख्या बड्या कंपनीत तगड्या पॅकेजच्या नोकरीच्या स्वप्नांवर पाणी फिरवावे लागले. परंतु, मुंबईतील विद्यार्थी अब्दुल्ला खान याला अपवाद ठरला आहे.

 

अब्दुल्ला खान हा IIT चा विद्यार्थी नसूनही त्याला गूगलने तगड्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर दिली आहे. अब्दुल्लाला गूगलच्या लंडन येथील ऑफिसमध्ये नोकरी मिळालील आहे. गूगलने अब्दुल्ला याला 1.2 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे.

 

सप्टेंबर 2019 मध्ये रुजु होईल अब्दुल्ला 

अब्दुल्ला 21 वर्षांचा असून तो मुंबई राहतो. तो सध्या इंजिनियरिंग करतो. अब्दुल्ला येत्या सप्टेंबर 2019 मध्ये लंडनमधील गूगलच्या ऑफिसमध्ये रुजु होणार आहे.

 

कोणतीही अॅप्लिकेशन न करता मिळाला नोकरी..

मीडिया रिपोर्टनुसार, अब्दुल्लाने गूगलमध्ये नोकरीसाठी कोणतीही अॅप्लिकेशन केली नव्हती. एका कंपनीद्वारा आयोजित एका इंटरव्ह्यूमध्ये अब्दुल्ला याला निमंत्रित करण्यात आले होते. प्रतिस्पर्धी प्रोग्रामिंग आव्हाने होस्ट करणार्‍या साइटवर अब्दुल्लाचे प्रोफाइल पाहिल्यानंतर गूगलकडून त्याला नोकरीसाठी काॅल आला. गूगलकडून आपल्याला नोकरीसाठी कॉल येईल, हे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. हा कॉल म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असल्याचे अब्दुल्लाने मीडियाशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...