आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईची विजयी सलामी, आंध्रने विदर्भाला राेखले; महाराष्ट्राचा डावाने पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बडाेद्यावर मुंबईची 309 धावांनी मात
  • हरियाणाचा महाराष्ट्रावर डाव व 68 धावांनी विजय
  • आंध्र प्रदेश वि. विदर्भ सामना बराेबरीत

​​​​​​वडाेदरा/ राेहतक : सूर्य कुमार यादवच्या कुशल नेतृत्वाखाली मुंबई संघाने यंदाच्या सत्रातील रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. दुसरीकडे दाेन वेळच्या विदर्भ संघाचा सलामी सामना अनिर्णीत राहिला. तसेच सुमार खेळीमुळे महाराष्ट्राच्या संघाला सलामीच्या लढतीत डावाने पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे महाराष्ट्राचा सत्राला चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. नाैशाद शेखच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या संघाने या सामन्यात हरियाणाच्या आव्हानाला सामाेरे जाण्याचा प्रयत्न केला.

सुर्यकुमारने आपल्या मुंबई संघाला स्पर्धेत चागंली सुरुवात करून दिली. आता हीच विजयी लय कायम ठेवण्याचा मुंबईच्या टीमचा प्रयत्न असणार आहे.

महाराष्ट्राचा लाजिरवाणा पराभव: हरियाणा संघाविरुद्ध सलामी सामन्यात महाराष्ट्राला सुमार फलंदाजीचा माेठा फटका बसला. त्यामुळे टीमचा डावाने पराभव झाला. हरियाणा संघाने डाव आणि ६८ धावांनी विजयी सलामी दिली. पहिल्या डावात हरियाणा संघाने ४०१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने पहिल्या डावात २४७ धावा काढल्या. यासह टीमला फाॅलाेऑनच्या नामुष्कीला सामाेरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या महाराष्ट्राचा दुसऱ्या डावात अवघ्या ८६ धावांवर खुर्दा उडाला. कर्णधार हर्षल पटेल (५/२२) आणि दीपक हुडा (४/३१) यांनी महाराष्ट्राला झटपट गुंडाळले. एकूण ९ बळी घेणारा कर्णधार हर्षल पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याची या सामन्यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्याने कुशल नेतृत्वात हे यश मिळवले. यासाठी त्याला गाेलंदाजांचे माेलाचे सहकार्य लाभले. यातूनच त्याला संघाचा विजय निश्चित करता आला. त्यानेही कुशल नेतृत्वाशिवाय दमदार गाेलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या. त्यापाठाेपाठ हीच लय कायम ठेवताना पाच विकेट घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात दीपक हुडाने चार बळी घेतले. यामुळे महाराष्ट्राच्या टीममधील फलंदाजांना माेठी खेळी करता आली नाही.

कर्नाटकची सत्रात तामिळनाडूवर चाैथ्यांदा मात 

कर्नाटकच्या संघाने यंदाच्या सत्रात तामिळनाडूविरुद्धचे आपले वर्चस्व कायम ठेवले. यातूनच कर्नाटकने रणजी ट्राॅफीच्या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात तामिळनाडूला धुळ चारली. कर्नाटकने २६ धावांनी तामिळनाडूवर मात केली. यासह कर्नाटकने यंदाच्या सत्रात तामिळनाडू टीमला चाैथ्यांदा पराभूत केले आहे.

मुलानीच्या चाैकाराने मुंबईचा विजय

सलामीवीर पृथ्वी शाॅच्या (२०२) द्विशतकापाठाेपाठ शम्स मुलानी (४/७२), अत्तरदे आणि पारकर (प्रत्येकी दाेन विकेट) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर मुंबईने गुरुवारी धडाकेबाज विजयाची नाेंद केली. मुंबईने ब गटातील आपल्या पहिल्या सामन्यात बडाेद्याला धूळ चारली. मुंबईने ३०९धावांनी सलामीचा सामना जिंकला. पहिल्या डावात ४३१ धावा काढणाऱ्या मुंबईने आपला दुसरा डाव ४ बाद ४०९ धावांवर घाेषित केला. यासह मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर बडाेद्यासमाेर ५३४ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पहिल्या डावात ३०७ धावा काढणाऱ्या बडाेदा संघाचा दुसऱ्या डावात अवघ्या २२४ धावांवर गाशा गुंडाळला. टीमकडून राजपूत (५३) आणि दीपक हुडाने (६१)एकाकी झुंज दिली. मात्र, त्यांना खडतर लक्ष्यच्या प्रत्युत्तरात आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. सामन्यात एकूण १० बळी घेणारा मुंबईचा शम्स मुलानी चमकला. त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.

विदर्भाला राेखून आंध्रने पराभव टाळला

दाेन वेळच्या किताब विजेत्या विदर्भाच्या अव्वल कामगिरीमुळे आंध्र प्रदेश संघावर पराभवाचे सावट हाेते. मात्र, टीमने सुरेख खेळी करताना विदर्भाला राेखून आपला पराभव टाळला. या दाेन्ही संघांतील सलामी सामना अनिर्णीत राहिला. विदर्भाने पहिल्या डावात ४०१ धावा काढल्या हाेत्या. पहिल्या डावात २११ धावा काढणाऱ्या आंध्र प्रदेशने दुसऱ्या डावात तीन बाद ३१४ धावा काढून सामना ड्राॅ केला. टीमकडून रिकी भुई (१००) आणि श्रीकार भरतने (१०२) नाबाद शतकी खेळी केली. यासह त्यांनी सामना ड्राॅ केला.

बातम्या आणखी आहेत...