आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mum's Warning After She Accidentally Creates Huge Chlorine Gas Cloud Trying To Unblock Her Toilet

मुलांनी केले होते घरातील टॉयलेट चोक, स्वच्छ करण्यासाठी महिलेने त्यामध्ये असे काही टाकले की, कॉलनी रिकामी करावी लागली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेल्सिया. इंग्लंडमधील एका महिलेला आपल्या टॉयलेटची स्वच्छता करणे महागात पडले. महिलेने टॉयलेटमध्ये असे काही केमिकल टाकले यानंतर तिला घर सोडून पळावे लागले. यासोबतच संपुर्ण कॉलनी रिकामी करण्यात आली. तिने स्वच्छतेसाठी ज्या घरगुती केमिकल्सचा वापर केला होता, त्यामुळे युध्दात उपयोगात येणारा विषारी गॅस तयार झाला. योग्य वेळी कळाल्यामुळे तिचे आणि तिच्या मुलांचे प्राण वाचले. 


तयार झाला भयानक विषारी गॅस 
- ही घटना इंग्लंडच्या समरसेटच्या नेल्सिया शहरातील आहे. येथे राहणा-या डोमिनिक हीथ नावाची महिला आपल्या तीन मुलांसोबत राहायची. डोमिनिकच्या घरातील टॉयलेट चोक झाले होते. तिने ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. 
- तिला वाटले की, जास्त टॉयलेट पेपर यूज केल्याने किंवा एखाद्या खेळण्यामुळे घरातील टॉयलेट चोक झाले असेल. यामुळे तिने त्याची स्वच्छता करण्यासाठी घरात ठेवलेल्या दोन साधारुन घरगुती रसायनांचा वापर केला. याचा काय परिणाम होईल याचा तिला जराही अंदाज नव्हता. 
- त्या केमिकल्सचा असा काही परिणाम झाला की, तिच्या घरात विषारी गॅस तयार झाले. तिचे घसा आणि डोळ्यांत जळजळ होऊ लागली. श्वास घेताना त्रास होऊ लागला आणि जीव गुदमरत असल्यामुळे तिने फायर ब्रिगेड आणि एमरजेंसी सर्व्हिसेसला फोन केला. 
- वृत्त मिळाल्यानंतर तिथे पोहोचलेल्या फायर ब्रिगेड स्टाफने महिलेला आणि आजुबाजूला राहणा-या लोकांना आपला परिसर रिकामा करण्यास सांगितला. यानंतर ते सेफ्टी डिव्हाइस घालून महिलेच्या घरात गेले आणि तेथील विषारी गॅस स्वच्छ केला.
 
तयार झाला होता युध्दात वापरला जाणार विषारी गॅस
- तपासणी केल्यानंतर कळाले की, ते दोन केमिकल्स मिक्स केल्यानंतर बाथरुममध्ये क्लोरीन गॅस तयार झाला, हे विषारी असते आणि मनुष्यासाठी खुप घातक असते. या गॅसचा वापर युध्दादरम्यान लोकांना मारण्यासाठी केला जातो. 
- महिलेने सांगितल्यानुसार, तिने रात्री जवळपास 8 वाजता स्वच्छता करण्यासाठी टॉयलेटमध्ये 'वन शॉट' नावाच्या क्लीनरच्या दोन बॉटल्स टाकल्या. याच्या काही तासांनंतर तीन लीटर ब्लीच टाकले होते. यानंतर तिथे काही रिअॅक्शन झाली आणि मोठ्या प्रमाणात गॅस तयार झाला आणि धुर निघू लागला. 
- यानंतर महिला घाबरली नाही. तिने समजदारी दाखवत घराचे सर्व दार खिडक्या उघडल्या. पण यानंतरही टॉयलेटमधून गॅस निघत होते. नंतर तिने शेजा-यांना मदत मागितली. सकाळी 5 वाजेपर्यंत ती घराबाहेरच राहिली. 
- महिलेने ही घटना फेसबुक वॉलवर शेअर करत दूस-या लोकांना ही चुक करु नका असे सांगितले. महिलेने सांगितले की, 'आम्ही सर्व आता ठिक आहोत, पण वास्तवात हे खुप गंभीर प्रकरण होते. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा वेडेपणा होता. कृपया असे करु नका.'

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...