आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा कुणासाठी ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळ्यामुळे शहराचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी खर्च केले जातात. ते फक्त सिंहस्थ कुंभमेळा म्हणून खर्च करू नयेत. सोयी- सुविधा या तात्पुरत्या नसाव्यात. साधू-संतांकरिता हा मेळा असला तरी अनेक भाविकांनी तो पाहून डोळ्याचे पारणे फेडले तर बिघडले कुठे? अलाहाबाद, वाराणसी, नाशिक अशा गंगेच्या ठिकाणी धर्मशाळा उभारून त्या कायमस्वरुपी असाव्यात. कुंभमेळ्यात जवळपासची जनताच नव्हे, तर संपूर्ण देशातील भाविक पदरमोड करून येत असतात. साधू, संत हे काही दिवसांसाठी येतात; पण जवळपासची जनता तेथे वास्तव्य करून असते. तसेच महिला साधू, संतांनाही आखाडा असणे गरजेचे आहे. साधू-संत हे राजकारणी नसतात; पण राजकीय नेते त्यांना प्रोत्साहित करताना दिसतात. कुंभमेळ्याचे शाही स्नान हे सर्वांनाच लाभफळ आहे. अनेक देवदेवता कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. तेव्हा कुंभमेळ्यामुळे शहर विकास होतो, हे कुणीही अमान्य करणार नाही.