आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mundka Swimming Instructor Planned To Kill 8 Murdered Wife First To Aviod Humilation

भयंकर... त्याला 8 मर्डर करायचे होते, आपण तुरुंगात गेल्यावर पत्नीचे कसे होईल म्हणून आधी तिचाच काढला काटा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या मुंडका परिसरात पाशवी क्रौर्याची एक भीतिदायक घटना समोर आली आहे. आठ मर्डरचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीची केवळ यासाठी हत्या केली, कारण तो तिच्या भविष्याविषयी चिंतित होता.

 

पत्नीची हत्या केल्यानंतर रचली खोटी कहाणी...
24 नोव्हेंबर रोजी त्याने सर्वात आधी बहाण्याने तिचे हातपाय बांधले, मग पाणी गरम करणाऱ्या रॉडने तिला विजेचा शॉक दिला. अनेकदा प्रयत्न केल्यावर पत्नी बेशुद्ध तर झाली, पण तिचा मृत्यू नाही झाला. अखेर, आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर तो पत्नीला रुग्णालयात घेऊन गेला, तेथे पत्नीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची कहाणी रचली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होण्याआधी तो पळून जाण्याच्या तयारीत होता. 25 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या जवळून 3 पिस्तूल आणि 30 काडतुसे हस्तगत करण्यात आली.

 

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने सांगितला घटनाक्रम...
गुरुवारी त्याने चौकशीत पोलिसांना हत्येचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. पोस्टमार्टम रिपोर्टच्या प्रतीक्षेत पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न करताच आरोपीला आर्म्स अॅक्टअंतर्गत तुरुंगात डांबले. 35 वर्षीय आरोपी राजीव कुमार मूळचा हरियाणाच्या जिंदचा रहिवासी आहे. तो स्विमिंग इंस्ट्रक्टर म्हणून काम करतो.  आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये 8 वर्षांपर्यंत स्विमिंग कोचची नोकरीही त्याने केलेली आहे. तेथून काही कारणाने त्याला काढून टाकण्यात आले होते.


पत्नीला हत्येच्या कटाबाबत सांगितले होते...
आरोपीने सांगितले की, ज्या 8 जणांची हत्या करण्याचा त्याने कट रचला होता, त्यात 2 कझन आहेत. यात एक महिला, एक एक्स गर्लफ्रेंड आणि तिचा पती, हॉटेलचा मॅनेजर व इतर तिघांचा समावेश होता. हत्या करणार असल्याचे त्याने पत्नीलाही सांगितलेले होते. ती त्याची नेहमी समजूत घालायची. यामुळे त्याला वाटले की, जर एवढ्या हत्या केल्या, तर त्याला एक ना एक दिवस जेलमध्ये जावेच लागेल. आपल्या मागे पत्नीचे आयुष्य बरबाद होईल, तिचा लोक गैरफायदा घेतील. या चिंतेमुळे त्याने सर्वात आधी पत्नीची हत्या करण्याचा कट रचला.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...