Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Municipal Corporation Ward structure

महापालिका प्रभागरचना; दिग्गजांच्या कपाळावर आठ्यांचा नकाशा

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 10:58 AM IST

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून प्रारूप प्रभागरचना व आरक्षणाची उत्सुकता शिगेला प

 • Municipal Corporation Ward structure

  नगर- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून प्रारूप प्रभागरचना व आरक्षणाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मनपा सभागृहात शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागरचना व आरक्षण पाहून काही दिग्गजांच्या कपाळावर आठ्या उमटल्या, तर काहींना दिलासा मिळाला. विद्यामान सदस्यांचा कार्यकाळ २९ डिसेंबरला संपणार आहे. प्रभागरचना करताना उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य, त्यानंतर पूर्वेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राहील याची काळजी घेण्यात आली.


  सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी ही सोडत काढली. बाहेरील बाजूस प्रारुप प्रभागरचना डकवण्यात आली होती. शहरातील १७ प्रभागांत प्रत्येकी चार नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत, तर सर्वसाधारणसाठी ४० जागा खुल्या आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपायुक्त ज्योती कावरे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील, सचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते.


  अशी आहे प्रभागरचना
  प्रभाग १ :
  आठरे पब्लिक स्कूल, डॉन बॉस्को सोसायटी, जय मंगल नगर, सुमन कॉलनी, भिस्तबाग, कवडेमळा, लखोनगर, नंदनवनगर, पवनवस्ती, बारस्कर वस्ती, संचारनगर, सेल्स टॉवर कॉलनी, वाणीनगर, यशोदानगर, मायसिनेमा, फणसेनगर, ढवणवस्ती, दक्षतानगर, कुशाबानगर, गोकुळनगर.आरक्षण : अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग २ : डोके विद्यालय, स्कॉलर क्लासेस, पद्मावतीनगर, हाडको, मातोश्री मोटार्स, बहिणाबाई सोसायटी, दसरेनगर, संभाजीनगर, नित्यसेवा, हॉटेल चेतना, नामेदवनगर, दत्तनगर, सिद्धेश्वराय कॉलनी, श्रीरामनगर, ऐश्वर्यानगर, वृद्धेश्वर मित्रमंडळ ग्राउंड, हॉटेल गारवा, लक्ष्मीनगर, अक्षता कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, श्रीकृष्णनगर, संदेशनगर, साईदीपनगर. अारक्षण : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण


  प्रभाग ३ : नागरदेवळे, दर्गादायरा, मुकुंदनगर, छोटी मिरिअम मशीद, जिल्हा बँक, वॉटर टँक, दरबार चौक, मौलाना आझाद चौक, वाबळे कॉलनी, हमीद मंझील, इस्लामपूर चौक, आयेशा मशीद चौक, दानीश महल, शालिमार सेल्स, कॉर्पोरेशन, इक्रा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, गोविंदपुरा. अारक्षण : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ४ : सहकारनगर, अभियंता कॉलनी, मॉडेल कॉलनी, वर्षा कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, नवलेनगर, गजानन महाराज मंदिर, बीएसएनएल एक्सचेंज, समतानगर, रेस्ट हाऊस, झालानी हॉस्पिटल, सीक्युएव्ही, सिव्हील हडको, मनपा कार्यालय, फकीरवाडा, सिंधी कॉलनी, पोलिस अधीक्षक कार्यालय, जीवनदीप हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, आनंदनगर, प्रकाशपूर, आनंदनगर.आरक्षण : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ५ : भिस्तबाग चौक, शिंदेेनगर, वैदूवाडी, श्रमिकनगर, सपकाळ हॉस्पिटल, मधुबन कॉलनी, रावसाहेब पटवर्धन स्मारक, प्रेमदान हडको, प्रोफेसर कॉलनी, यशश्री नर्सरी, एलआयसी कॉलनी, आकाशवाणी, नोबल हॉस्पिटल, बिशप लॉईड कॉलनी, हेरंब कॉलनी, वाणीनगर, गुलमोहोर रस्ता, गॅलक्सी हॉस्पिटल, पोस्ट कॉलनी, गणेश चौक, सिव्हील हडको. आरक्षण : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ६ : कराळे हेल्थ क्लब, मेघनंद रिसॉर्ट, होमिओपॅथी कॉलेज, आयसीएफआय नॅशनल कॉलेज, ऑक्झिलिअम, सिद्धिविनायक कॉलनी, सावेडी बसस्थानक, अस्मिरा नर्सरी, श्रीनाथ सोसायटी, सावेडी गावठाण, डौले हॉस्पिटल, न्यू प्रमेदान हडको, गणपती मंदिर, साई कॉलनी, नाना-नानी पार्क, महालक्ष्मी उद्यान, भिंगारदिवे मळा, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, बोरुडे मळा. अारक्षण : अ- अनुसूचित जमाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ७ : विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पितळे कॉलनी, आदर्शनगर, भंडारी कॉलनी, साई गेस्टहाऊस, राघवेंद्र स्वामी मंदिर, काकासाहेब म्हस्के कॉलेज, अंकुर कॉलनी, सनफार्मा कॉलेज, आंबेडकर चौक, साईराज नगर, मारुती मंदिर, कातोरेनगर, रेणुकानगर, मनोलीला नगर, शनिधाम, सुजय बाजार, शहर बँक, म्हसोबा मंदिर. आरक्षण : अ अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ८ : गांधीनगर परिसर, नालेगाव चाहुराणा खुर्द, वॉटर टँक फेज २, सुडके मळा, योगदान आयुर्वेद हॉस्पिटल, बोरुडे मळा, लेंडकर मळा, गंधे मळा, जाधव मळा, कॉस्मिक कॉलनी, रेणावीकर कॉलनी, दातरंगे मळा, बागरोजा, ठाणगे मळा, वारुळाचा मारुती परिसर, भगवान ऋषी सोसायटी, प्रशांत सोसायटी, व्यंकटेश सोसायटी, भृंगऋषी सोसायटी. आरक्षण : अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ९ : महावीरनगर, सारडा महाविद्यालय, लालटाकी चौक, अप्पू हत्ती, वहाडणे हॉस्पिटल, न्यू आर्टस् बॉईज होस्टेल, स्वास्थ्य हॉस्पिटल, जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, जुने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे विद्यापीठ उपकेंद्र, पोलिस क्वार्टर, न्यू आर्टस् कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, सिद्धीबाग, सर्वोदय कॉलनी, संबोधी विद्यालय, बागडपट्टी, डीएड कॉलेज, तोफखाना, सर्जेपुरा चौक, करंदीकर हॉस्पिटल. आरक्षण : अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १० : सिव्हिल हॉस्पिटल, तारकपूर बसस्थानक, झेंडे हॉस्पिटल, राधाबाई काळे महाविद्यालय, जुने आरटीओ ऑफिस, तांबोळी मशीद, कृष्णा ईनक्लेव्ह, कराचीवाला नगर, रामवाडी, इनकम टॅक्स ऑफिस, एसटी डेपो, हत्ती पुतळा, जैन बोर्डिंग, एम्स हॉस्पिटल, एस. टी. वर्कशॉप, कोठला बापूशाह दर्गाह, मंगलगेट, हॉटेल मिलन, झेंडीगेट, हवेली, हुंडेकरी ऑफिस, दाळमंडई, धूत हॉस्पिटल, झेंडीगेट शाळा क्रमांक ४. आरक्षण : अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग ११ : आडते बाजार, चंद्रशेखर फोटो स्टुडिओ, रामचंद्र खुंट, गंजबाजार, पारशा खुंट, बादशहा मस्जिद, पोस्ट ऑफिस, टेलिफोन भवन, बूथ हॉस्पिटल, हातमपुरा, सिमेंट हाऊस, सिटी म्युझिअम, रेव्हेन्यू सोसायटी, काळी मशीद, धरती चौक बसस्टॉप, आयएमएस कॉलेज, क्लेरा ब्रूस, सीएनआय चर्च, कोठी चौक, नगर कॉलेज, एमएसईबी ऑफिस, लोकसत्ता, गव्हर्मेंट हायस्कूल, सरोश बाग, एपीएमसी. आरक्षण : अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १२ : मेहमुदी मस्जिद, स्ट्रॉबेरी सुपर बाजार, मार्कंडेय शाळा, गांधी मैदान, सारडा शॉप, मयूर कंपौंड, गुलाम अली मशीद, खिस्ती लॉज, आशा चौक, कोतवाली ठाणे, हॉटेल अभय पॅलेस, माळीवाडा, रमेश फिरोदिया प्रशाला, मुंजोबा स्विट्स, महावीर आर्ट गॅलरी, लकी लॉज, जुने बसस्थानक, हॉटेल इम्पिरियल, रयत शिक्षण संस्था, आनंदधाम, नंदनवन कॉलनी. आरक्षण : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १३ : नेहरु मार्केट, गौरी मंदिर, नालेगाव, कोर्ट गल्ली, दो बोटी चिरा, यतिमखाना, शनिचौक, आयुर्वेद कॉलेज, फिरोदिया हायस्कूल, वाडिया पार्क, जिल्हा परिषद, लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, हॉटेल संकेत, स्वस्तिक चौक बसस्थानक, नंदनवन लॉन, अक्षता गार्डन, सक्कर चौक, अफाली आयुर्वेदिक फार्मा. आरक्षण : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १४ : जिजामाता गार्डन, सारसनगर, आनंदधाम, चर्च, भवानीनगर, आनंदऋषी हॉस्पिटल, उदयनराजे पॅलेस, माणिकनगर, भोसले आखाडा, शिल्पा गार्डन, बजाज शोरुम, विनायकनगर, मातोश्री जॉगिंग पार्क, आयसीएआय भवन, अहिंसानगर, नक्षत्र लॉन, पोकळे मळा, अवसरकर मळा, रेणुकामाता मंदिर, कॉर्पोरेशन बँक, भगवानबाबा मंदिर, वैष्णवदेवी मंदिर. आरक्षण : अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १५ : एकनाथनगर, सेंट थॉमस कॅथोलिक चर्च, आगरकर मळा, खोकरनाला, विशाल कॉलनी, एकता कॉलनी, झेडपी कॉलनी, सागर कॉम्प्लेक्स, जय भिमनगर, संभाजी कॉलनी, शिवनेरी चौक, गौतमनगर, मनपा शाळा क्र. ४, रेल्वेस्टेशन परिसर, लक्ष्मीकृपा हाऊसिंग सोसायटी. आरक्षण : अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १६ : केडगाव, भूषणनगर, हॉटेल रंगोली, एचपी पेट्रोल पंम्प, रेणुकानगर, बसस्थानक, बँक कॉलनी, शाहूनगर, केडगाव गावठाण परिसर, महाराणी ताराबाई विद्यालय परिसर, पाच गोदाम परिसर. आरक्षण : अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण.


  प्रभाग १७ : कायनेटिक चौक, प्रियंका कॉलनी, सुखकर्ता कॉलनी व सोसायटी, पांजरापोळ, अंबिका विद्यालय, शिवसागर कॉम्प्लेक्स, रेणुकादेवी मंदिर, मोहिनी नगर, हनुमाननगर, लक्ष्मीकृपा हाऊसिंग सोसायटी, कायनेटिक कंपनी, एकता कॉलनी. अारक्षण : अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण.


  सोमवारी अधिसूचना
  सोमवारी (२७ ऑगस्ट) आयुक्त प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील. ५ सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचना मागवल्या जातील. हरकतींवर १५ सप्टेंबरला सुनावणी होईल. २४ ला शिफारशी नोंदवून ही माहिती निवडणूक आयुक्तांना सादर होईल. १ ऑक्टोबरला प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना जाहीर होईल.


  राजकीय गप्पांचा फड रंगला
  आरक्षण सोडतीनंतर मनपाच्या आवारात राजकीय गप्पांचा फड रंगला. महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्या प्रभागांना फारसा धक्का लागलेला नाही. सभापती बाबासाहेब वाकळे यांना फारसा फटका बसल्याचे दिसत नाही. भाजपचे किशोर डागवाले यांच्याही प्रभागात मध्यवर्ती भाग आला. अनिल शिंदे, माजी सभापती सुवर्णा जाधव, सारिका भुतकर, दीप चव्हाण यांच्या प्रभागात विभागणी झाली. उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या प्रभागाची तोडफोड झाली असून त्यांच्यासमोर सर्वसाधारण जागेवर उभे राहण्याचाही पर्याय आहे. प्रभागांची धक्कादायकरित्या तोडफोड झाल्याने अनेकजण चकीत झाले आहेत.

Trending