आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगाच्या लग्नास २० हजार देणार; मनपाची 1.03 कोटी तरतूद, खेळाडूंनाही देणार मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या १४ योजना देण्यात येत आहे. त्यापैकी तीन योजनेचा प्रत्यक्ष सुरुवात अपंग दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. 

शालेय व महाविद्यालय आणि मतिमंद अशा १५ जणांना प्राथमिक स्वरूपाचे वाटप सोमवारी सायंकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेकडील नोंदीनुसार शहरात १७६१ दिव्यांग असून, त्यांना देण्यात येणारे अनुदान रकमेपोटी महापालिकेच्या तिजोरीवर १.०३ कोटी बोजा पडणार आहे. 

 

दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने अनुदान देण्याची प्रक्रिया या वर्षापासून सुरू करण्यात आली आहेे केलेल्या सर्व्हेनुसार १७६१ जण अनुदानास पात्र आहेत. यापैकी दिव्यांगाच्या लग्नास २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हायस्कूलमध्ये शिकणाऱ्यांना दरवर्षी ५०० तर महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्यांना हजार रुपये याशिवाय खेळाडू असतील तर अनुक्रमे ५०० व हजार रुपये अतिरिक्त देण्यात येणार आहे. मनपा मेजर व मिनी गाळ्यात ३ टक्के आरक्षण, मनपा अपंग स्पर्धेत सहभागी होत असतील तर प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस रोख रकमेत देण्यात येणार आहे अशा प्रकारच्या योजनेचा समावेश आहे.

 

सोमवारी अपंग दिनाच्या निमित्ताने या योजनेची सुरुवात करण्यात आली. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्रीनिवास करली, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, महापालिका कामगार कल्याण अधिकारी विजय कांबळे, अपंग संघटनेचे फणीबंद यांच्यासह अनुदानाचे लाभार्थी, पालक आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना विविध योजनेचे लाभ देण्यात येत आहे. त्याचे वाटप अपंग दिनाच्या निमित्ताने महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

संजय गांधी निराधार याेजना समितीच्या वतीने अनुदान मंजूर 
संजय गांधी निराधार याेजना समितीच्या वतीने दिव्यांगाना हे माझे सरकार, मी लाभार्थी या माध्यमातून विडी घरकुल, २५६ गाळा, रविवार पेठ, भवानी पेठ, जोशी गल्ली, साखर पेठमधील लाभार्थींना अनुदान मंजूर करण्यात आले. त्यांचे वितरण अपंग दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. यावेळी ५३ जणांना याचा लाभ मिळाला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, पुरुषोत्तम पोबत्ती, लक्ष्मीकांत गड्डम, इंदिरा कुडक्याल, दत्ता बडगू, तलाठी विजय विजापुरे आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...