आगामी / 'मुन्नाभाई 3' चित्रपटाचे काम रखडले, नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले अर्शद वार्सी आणि संजय दत्त

तीन स्क्रिप्ट लिहून बसले आहेत हिराणी, तरीदेखील थांबले काम

Nov 08,2019 11:46:13 AM IST

अमित कर्ण

मुंबई : संजय दत्त आणि अर्शद वार्सी यांच्या जोडीची प्रेक्षक वाट पाहत आहेत. 'मुन्नाभाई' सिरीजमध्ये दोघांनाही लोकांनी पसंती दिली होती. 'मुन्नाभाई 3' विषयी चर्चा होती की, राजकुमार हिराणी याचा सिक्वेल घेऊन येणार होते, परंतु संजय दत्त आपल्या कायदेशीर समस्येचे निराकरण करण्यात गुंतला होता. मात्र आता 'मुन्नाभाई 3' डबाबंद झाला आहे. मात्र, हिराणी मुन्ना आणि सर्किटच्या जोडीला पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये सोबत आणू इच्छित आहे. अर्शदने नुकतीच आपल्या आगामी चित्रपटाविषयी हिंट दिली आहे. त्याने सांगितले, संजय दत्त एका चित्रपटात दिव्यांग डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तो मार्गदर्शकाची भूमिका साकारणार आहे.

डबाबंद झाला 'मुन्नाभाई 3'

हिराणीवरील मीटूच्या आरोपामुळे या चित्रपटाचे काम पुढे चालू शकले नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी बाेमन इराणी यांनीदेखील हा सिक्वेल होणार नसल्याचे सांगितले होते. आता अर्शद वार्सी म्हणाला की, स्क्रिप्टच्या कमतरतेमुळे हा चित्रपट पेटीपॅक हाेणार आहे. हिराणी कायदेशीर पेचात अडकल्यामुळे चित्रपटाचे काम पुढे ढकलले गेले. अर्शद, हिराणी आणि सुभाष कपूर यांनी सोबत काम केले आहे. आरोपांबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'लोक काय म्हणतात, काय नाही म्हणत, ते मला माहीत नाही. मी या दोन लोकांना ओळखतो. त्यांना कधीच उलटे काम करताना पाहिले नाही. मी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. राजकारण करण्यासाठी मी काहीही उत्तर दिले असते.

पुढच्या वर्षी सुरू होईल, साजिद-फरहादसोबतच नवा चित्रपट

सूत्रानुसार, संजय आणि अर्शद साजिद-फरहादच्या चित्रपटात सोबत दिसणार आहेत. पुढच्या वर्षापासून ही जोडी यावर काम करणार आहे. शूटिंग मार्च-एप्रिल २०२०मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याचा पहिला भाग बुडापेस्टमध्ये सुरू होईल. याविषयी अर्शद म्हणतो...., संजय यात दृष्टिहीन डॉनची भूमिका करणार आहे आणि मी त्याला मार्ग दाखवणाऱ्याच्या भूमिकेत आहे.

'मुन्नाभाई 3'वर म्हणाला अर्शद ...

'हा सिक्वेल येणार नाही, असे मला वाटत आहे. खरं तर, राजूने याच्या सिक्वेलसाठी तीन वेगवेगळ्या कथा आणि पटकथा लिहिल्या आहेत. एका स्क्रिप्टच्या पहिल्या भागात काही अडचणी आहेत तर दुसऱ्याच्या स्क्रिप्टच्या दुसऱ्या भागात काहीतरी राहिले आहे. मी जेव्हा-जेव्हा राजूला विचारतो तेव्हा तो म्हणतो, शंभर टक्के तो पूर्ण होईलच. कधी, कसे आणि केव्हा, हे विचारू नको.

दुसरीकडे 'इश्किया'च्या िसक्वेलवर वेगाने काम सुरू आहे. याविषयी विशाल भारद्वाजशी बोलणे झाल्याचे अर्शद म्हणाला. याचा पुढचा भाग यावा असे दोघांनाही वाटत होते. अर्शद, नसीरुद्दीन दोघेही 'इश्किया'च्या सिक्वेलसाठी सज्ज आहेत.

X