आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना गेल्या 11 वर्षांपासून मुस्ताक काझी देत आहे मोबाइल चार्जिंगची सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्ताक काझी यांच्याकडून मोबाइल चार्ज करून घेताना वारकरी - Divya Marathi
मुस्ताक काझी यांच्याकडून मोबाइल चार्ज करून घेताना वारकरी

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरुन - हजारो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीला पायी दिंडी  सोहळ्यातुन येतात. या दरम्यान वारकऱ्यांना भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या असते ती मोबाईल चार्जिगची. यामुळे वारकऱ्यांना आपली खुशाली घरी कळवणे कठीण होऊन बसते.

 

सध्याची गरज ओळखून मुस्ताक नय्युम काझी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गेल्या अकरा वर्षांपासून चार्जिग पॉईंटची सुविधा देत आहेत. आळंदी ते पंढरपूर या मार्गावरुन गेल्या तीस वर्षांपासून सोबत येतात. चौथी नापास असलेले काझी 19 वर्ष वारीसोबत सायकल व मोटार सायकल वर स्टो रिपेअरींगचा व्यवसाय करत होते. दरम्यान काझी यांना व त्यांच्या कुटुंबियांना मोबाईल चार्जिग करण्यास मिळाली नसल्याने त्यांचा मोबाईल तीन दिवस बंद राहिला. त्यांना कोणीही मोबाईल चार्जिंगला लावू दिला नाही. या कालावधीत गावातील दोन लोकांचा मृत्यु झाल्याची माहिती काझी यांना मिळू शकली नाही. स्वतःला आलेल्या अनुभवावरुन शहाणे होत काझी यांनी पालखी सोहळ्यात चार्जिंग पॉईंटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या अकरा वर्षांपासून काझी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चार्जिंग पॉईंटची सुविधा उपलब्ध केली आहे. एका वेळेस 110 मोबाईल चार्जिंग होऊ शकतात अशी व्यवस्था काझी यांनी केली आहे. विशेष म्हणजे काझी हे वारकऱ्यांकडे पैसे द्यावेच असा अट्टहास धरत नाहीत. वारकरी जो मोबदला देतील तो ते आनंदाने स्वीकारतात.

 

काझी यांच्या सेवेमुळे हजारो वारकरी समाधानी
काझी यांच्या या सेवेमुळे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील  मोबाईलधारकांना मोबाईल चार्जिंगची चिंता भेडसावत नाही. पालखी सोहळ्यात ही एकमेव चार्जिंग सुविधा आहे. यामुळे दररोज डिस्चार्ज झालेला मोबाईल चार्ज होऊ लागल्याने पालखीतील हजारो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.


दररोज सातशे ते एक हजार मोबाईल होतात चार्ज- 
काझी यांनी टमटम मध्ये जनरेटर ठेवले आहे. त्या जनरेटरला कनेक्शन देऊन प्लस्टिकच्या ट्रेचा लाईट बोर्ड बनविला आहे. चार बोर्डद्वारे एकशे दहा मोबाईल चार्ज होऊ शकतात. दररोज सातशे ते एक हजार मोबाईल चार्ज केले जातात..

 

माझ्यासारखी गैरसोय इतरांना होवू नये यासाठी सुरु केली सेवा

पालखीत स्टोव्ह रिपेअरिंगचा व्यवसाय करत असताना चार्जिंग नसल्याने मोबाईल बंद झाला. यावेळी कोणीही मोबाईल चार्जिंगला लावू दिला नाही. यामुळे तीन दिवस मोबाईल बंदच राहिला. अखेर एका ठिकाणी पैसे देऊन विनवणी करत मोबाईल चार्ज केला. मोबाईलला चार्जिंग नसल्याचे गावात दोन नातेवाईकांचे मृत्यू झाला याची माहिती मला मिळू शकली नाही. माझ्यासारखी गैरसोय इतरांना होऊ नये या हेतूने मी अकरा वर्षांपासून चार्जिंग पॉईंट सुरु केला आहे. वारकरी देखील यामुळे खुश होतात. यातंच मला माऊलींच्या भक्तीचे समाधान मिळते आहे -
मुस्ताक काझी, गुजूंटी ता.उमरंगा जि उस्मानाबाद