आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द ग्रेट इंडियन पॉलिटिकल ड्रामा : अडवाणी यांच्यानंतर आता मुरली मनोहर जोशी यांचे तिकीट कापले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपने मंगळवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचेही तिकीट कापले. अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणींसोबत भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले ८५ वर्षीय जोशी यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींसाठी वाराणसी जागा सोडली होती. ते ६ वेळा लोकसभा आणि २ वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले. गेल्या वेळी ते कानपूरहून खासदार होते. या वेळी कानपूर अथवा इतर कोणत्याही मतदारसंघातून लढू नका, असा निर्देश पक्षाने जोशींना दिला. उत्तर प्रदेशमध्ये मंत्री असलेले सत्यदेव पचौरी यांना कानपूरचे तिकीट मिळाले. अयोध्येत वास्तू पाडली गेली तेव्हा १९९१ ते १९९३ या काळात जोशी भाजपचे अध्यक्ष हाेते. दरम्यान, मंगळवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी खासदार व अभिनेत्री जयाप्रदा यांना ५ तासांतच रामपूरचे तिकीट देण्यात आले आहे.


अनेक चेहरे रिंगणाबाहेर
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांता कुमार, कलराज मिश्र, बी. सी. खंडुरी, राजेन गोहन आणि बिजॉय चक्रवर्ती यांना तिकीट नाकारण्यात आले. तर, सुषमा स्वराज, उमा भारती यंदा निवडणूक लढवणार नाहीत.


जयाप्रदा : दोनदा सपा खासदार, भाजप त्यांचा पाचवा पक्ष, आझम खानना आव्हान 
- १९९४ मध्ये टीडीपीतून राजकीय कारकीर्द सुरू. २००४ व २००९ मध्ये सपाच्या तिकिटावर विजयी. नंतर अमरसिंह यांच्या पक्षात गेल्या. नंतर रालोदमध्ये राहिल्या, आता भाजपत आहेत.   
- रामपूरमध्ये ५० टक्के लोकसंख्या मुस्लिम. सपाकडून आझम खान उमेदवार. त्यामुळे जागा राखण्यासाठी भाजप तगडा उमेदवार शोधत होता. जयाप्रदा यांच्या रूपाने तो मिळाला.   


शत्रुघ्न : २७ वर्षे भाजपत राहूनही शत्रूच... काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 
- शत्रुघ्न १९९२ मध्ये राजकारणात आले. राजेश खन्नांनी पराभूत केल्यानंतर म्हणाले, निवडणूक लढवणे मोठी चूक होती. २००२ मध्ये राज्यसभेतून मंत्री झाले. २००९ मध्ये लोकसभेत खासदार. २०१४ मध्येही विजयी. तेव्हापासून मोदींवर टीका करताहेत. 
- २८ मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. राहुल गांधी त्याच दिवशी पाटणा साहिब येथून रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात त्यांची उमेदवारी जाहीर करतील.


- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना विमानतळावर काळे झेंडे दाखवण्यात आले. पाटणा साहिब येथून उभे राहण्यास इच्छुक असलेले राज्यसभा सदस्य आर. के. सिन्हा यांच्या समर्थकांनी हे काळे झेंडे दाखवले. दोघांच्या समर्थकांत हाणामारीही झाली.  


- प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले रविशंकर प्रसाद पाटण्याचेच रहिवासी आहेत. आर. के. सिन्हा एका प्रमुख खासगी सुरक्षा एजन्सीचे संस्थापक आहेत. ते कायस्थ समाजाचे आहेत. बंडखोर शत्रुघ्नही त्याच समाजाचे आहेत.


- दिवंगत अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनींनाही डावलले
द. बंगळुरूमधून ६ वेळा खासदार राहिलेले दिवंगत अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांना तिकीट देण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी २८ वर्षीय तेजस्वी सूर्य यांना संधी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...