आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.20 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली 'मर्डर 2' च्या अभिनेत्याला झाली अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : चित्रपट 'मर्डर-2' आणि 'पीएम नरेंद्र मोदी' मध्ये काम केलेला अभिनेता प्रशांत नारायणन आणि त्याच्या पत्नीला फसवणुकीच्या केसमध्ये अटक केली गली आहे. प्रशांत नारायणन केरळचा आहे आणि त्याच्या अटकेच्या सूचनादेखील केरळ पोलिसांनीच दिली आहेत. प्रशांत नारायणनच्या अटकेबद्दल अधिकारी प्रतापने सांगितले, "ही फसवणुकीची केस आहे, याची तक्रार थॉमस पेनीकर यांनी केली आहे. थॉमस पेनीकर मल्याळम चित्रपटाचे निर्माते आहेत. 2017 मध्ये आलेल्या त्यांच्या चित्रपटात प्रशांत नारायणनने महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ते दोघे एकमेकांना चांगले ओळखू लागले होते. पेनीकर आणि प्रशांत नारायणन यांची मैत्री झाल्यावर अभिनेत्याने त्यांना सांगितले की, त्याच्या पत्नीच्या पित्याची मुंबईमध्ये एक कंपनी आहे आणि जर त्यांनी तिथे गुंतवणूक केली तर त्यांना त्या कंपनीचा संचालक बनवले जाईल." 
 
 
पोलिसांनी पुढे सांगितले, "पेनीकरने या कंपनीमध्ये सुमारे 1.20 कोटी रुपये गुंतवले. पण यानंतर त्यांना कळाले की, त्यांची फसवणूक झाली आहे." पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सात सदस्यांची पोलिसांची टीम तीन दिवस कसून तपास केल्यानंतर मुंबईला पोहोचली आणि तिथे त्यांनी आरोपी प्रशांत नारायणनला अटक केली. प्रशांत नारायणन आणि त्याची पत्नी शोनाला ट्रांजिट वॉरंटवर केरळला आणले गेले आहे. याव्यतिरिक्त न्यायालयाच्यावतीने आरोपींना 20 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...