आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजी न आवडल्याने मित्राकडून डोक्यात दगड घालून खून, पुण्यातील नऱ्हे येथील घटना 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बनवलेली भाजी न आवडल्याच्या वादातून मित्राने झोपेत असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे मुंबई- बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथे घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काटकर (२९, रा.येवलेवाडी, पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


किरण व पप्पू मित्र असून ते सेंट्रिंगची कामे करत होते. दोघेही पंधरा दिवसांपूर्वी सेंट्रिंगची कामे करण्यासाठी नऱ्हे येथे आले होते. या दोघांसोबत किरणचा काकाही खोलीत राहत होता. सोमवारी रात्री किरणने भाजी आणून बनवली होती. मात्र, पप्पूला भाजी न आवडल्याने त्याने वाद घातला होता. या वेळी किरणने पप्पूला एक फटकादेखील मारला होता. याचा राग पप्पूच्या मनात होता. दरम्यान, पहाटे किरणचा काका उठून शौचाला बाहेर गेला होता. ही संधी साधत पप्पूने झोपेत असलेल्या किरणच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. किरणच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी राहणारी महिला जागी झाली. तिने शेजारी जाऊन बघितले असता किरण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर पप्पू फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...