आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

57 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून; मृतदेह विहिरीत फेकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव बढे- डोके व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून एका ५७ वर्षीय व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह पिंपळगाव देवी शिवारातील मृतकाच्याच विहिरीत फेकून दिला आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

पिंपळगाव देवी येथील मीना रामभाऊ कवळे वय ४८ यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, पती रामभाऊ नारायण कवळे वय ५७ यांना दारूचे व्यसन होते. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजता ते नेहमीप्रमाणे काहीही न सांगता घरून निघून गेले. परंतु सायंकाळ झाली तरी ते घरी परत आले नाही. त्यामुळे मृतकाची पत्नी मीना कवळे या चुलत सासूसोबत पतीला शोधण्यासाठी शेतात गेली असता शेतातील विहिरीतील पाण्यावर पतीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. बाहेर काढल्यानंतर मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या डोक्याला गंभीर जखम व पाठीवर मारहाणीचे व्रण दिसून आले. त्यामुळे अज्ञात आरोपीने मृतकाच्या डोक्यावर व पाठीवर जबर प्रहार करून त्यांचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...