आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​जुन्या वादातून युवकाचा खून; आष्टी तालुक्यातील धिर्डी शिवारात आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - जुन्या वादाच्या कारणावरून युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार आष्टी तालुक्यातील धिर्डी शिवारात सोमवारी उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस चौकशी करत होते. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रियाही उशिरापर्यंत सुरू होती. 


दीपक पठाण साठे (२४) याचा सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर शस्त्राचे वारही आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. यामुळे खळबळ उडाली आहे. 
दोन संशयितांची चौकशी 


जुन्या वादाची किनार ? 
दीपक याचा खून जुन्या वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धिर्डी, नांदा व शिराळ या शिवाराच्या हद्दीत कोळशाचा व्यापार करणाऱ्या कातकर समाजाच्या लाेकांची वस्ती आहे. या वस्तीजवळ राहणाऱ्या सत्यवान दौलत घोगरकर व विमल सत्यवान घोगरकर यांच्याशी दीपक याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून हा खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. 

बातम्या आणखी आहेत...