आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोडला 'रस्त्यावर पाय पसरून का बसला' या किरकाेळ कारणावरून युवकाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- 'रस्त्यावर पाय पसरून का बसला' या किरकाेळ कारणावरून तीन युवकांनी एका युवकाला लोखंडी रॉड आणि बॅटने बेदम मारहाण केल्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिन्नर फाटा भागात ही घटना घडली असून, नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अझीम शेख (विष्णूनगर, सिन्नर फाटा) शनिवारी (दि. २२ डिसेंबर) रात्री २ वाजेच्या सुमारास घरासमोर रस्त्यावर बसलेला असताना संशयित सचिन अमरनाथ महाजन (३६), नाना अमरनाथ महाजन (४०), राहुल ज्ञानेश्वर महाजन (२०, सर्व, रा. विष्णूवाडी, सिन्नर फाटा) यांनी हुज्जत घातली व लोखंडी रॉड, बॅटने हल्ला करीत गंभीर जखमी केले. या घटनेनंतर अझीम याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा रविवारी (दि. २३) सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


पोलिसांनी संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस करत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...