आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामानेच केला भाच्याचा खून, आपल्या मुलीसोबत भाच्याचे प्रेमसंबंध असल्याचा होता राग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैराग (सोलापूर) - आपल्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याने मामाने भाच्याचा खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली. समाधान जाधव (२५, गुंजेवाडी, ता. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. कृष्णा वाईंगडे, राधा दैंगडे (पिंपरी, ता. बार्शी) अशी संशयितांची नावे आहेत. 


अन्य एक आरोपी कृष्णाचा मुलगा असून तो अल्पवयीन आहे. कृष्णा हा समाधानचा मामा असून त्यानेच बालपणापासून समाधानचा सांभाळ केला आहे. कृष्णाला दहावीत शिकणारी १६ वर्षांची मुलगी आहे. समाधान व मुलीचे प्रेमप्रकरण होते. तिच्याशी लग्न करण्याबाबत समाधानने मामाला विचारलेही होते. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा विवाह करण्याची कृष्णाची इच्छा नव्हती. तरीसुद्धा समाधान ठाम होता. घटनेच्या दिवशी तो मद्यप्राशन करून मित्रांसोबत घरी आला. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. समाधान शेती प्रकरणातील न्यायालयाच्या तारखेनिमित्त उस्मानाबाद येथे गेला होता. तिथून तो अमोल श्रीकांत ढगेकरसोबत दुचाकीने वैरागमध्ये आला. याची माहिती मिळताच कृष्णा वाईंगडे, पत्नी राधा आणि अल्पवयीन मुलाने पाठलाग करत त्याला गाठून लाकडाने बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याच्या नाक व कानातून रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. 


मृत्यू झाल्याची कल्पना नाही 
आम्ही परत येत असताना तो शेतात निघाला होता. तो मृत झाला असावा याची कल्पना आम्हाला नव्हती. गुरुवारी सकाळी सण साजरा करत असताना तो मृत झाल्याची माहिती मिळाली. आम्ही घाबरून गेलो, असे अल्पवयीन संशियाताचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...