आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही पोलिसांच्या हत्येचे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' न्यायालयात चालवावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- चांदूर रेल्वे आणि अचलपूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांनी हल्ला चढवून खून केला. या प्रकरणाचा सखोल व तंत्रशुद्ध तपास करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. असा तपास या दोन्ही प्रकरणात करण्याच्या सूचना शुक्रवारी (दि. ७) एडीजी परमबीर सिंग यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना झालेली शिक्षा लक्षात घेता भविष्यात पोलिसांवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही, असेही त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. 


अमरावती आयुक्तालयात तपाेवन, एमआयडीसी व साईनगर भागात तीन नवीन पोलिस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव दहा वर्षांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. मात्र दहा वर्षांनतरही शहरात तीन तर दूर एकही नवीन पोलिस ठाणे सुरू झालेले नाही. वास्तविकता शहरातील लोकसंख्येत वाढ झाली आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र मनुष्यबळ तोकडे आहे. त्यामुळे आहे त्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढतच मात्र नवीन ठाण्यांची स्थापना झाली नाही. शहरातील नवीन ठाण्याच्या प्रस्तावाबाबत आपण वरिष्ठांसोबत चर्चा करून त्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. तसेच दोषसिद्धीचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे मात्र यापेक्षाही प्रमाण वाढावे, यासाठी अधिक सखोल तपास करणे, महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये सरकारी पंच वापरणे, अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या असल्याचेही एडीजी सिंग यांनी सांगितले आहे. 


एसपी, सीपींना अपीलच्या अधिकारासाठी प्रयत्न 
एखाद्या महत्वाच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयात आरोपी निर्दोष सुटतात मात्र तपास अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सखोल तपास केलेला असतो, पुरावे गोळा केलेले असतात. त्यानुसार या प्रकरणात आरोपींना शिक्षा होणे पोलिसांना अपेक्षित राहते. मात्र आरोपींना शिक्षा होत नाही. अशा प्रकरणात पोलिसांना थेट उच्च न्यायालयात अपील करता येत नाही. त्यामुळे ही अपिल करण्याचे अधिकार एसपी व सीपींना मिळावेत, यासाठी आमचे वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही एडीजी सिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...