आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेः 14 वर्षांपासून फरार असलेल्या कैद्याला सासरवाडीतून अटक, 2005 मध्ये घेतला पॅरोल अन् परतलाच नव्हता...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - येथून पोलिसांनी कुख्यात कैद्याला अखेर मंगळवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 वर्षांपासून त्याचा शोध घेतला जात होता. एकनाथ मुकणे असे त्याचे नाव असून त्याला खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2005 मध्ये तो पॅरोलवर सुटला होता. परंतु, तेव्हापासून तुरुंगात परतलाच नाही. ठाणे येथील एका गावात आपल्या सासरवाडीमध्ये त्याचा पत्ता लागला.


स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी नितीन ठाकरे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, नितीन ठाकरे याचा 1997 मध्ये आपल्या काकासोबत संपत्तीवरून वाद झाला होता. त्याचवेळी नितीनने काकांचा गळा आवळून त्यांची हत्या केली होती. नितीन ठाकरेला अटक करण्यात आली. 1999 मध्ये कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला येरवडा येथील केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते.


शिक्षा सुनावल्याच्या 6 वर्षांनंतर 2005 मध्ये त्याला 15 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. परंतु, पॅरोलची मुदत संपल्यानंतरही तो तुरुंगात परतलाच नाही. यानंतर नितीनच्या विरोधात कलम 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला फरार घोषित करण्यात आले. आता 41 वर्षांचा असलेला नितीन कल्याण तालुक्यातील एका ठिकाणी लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी नितीनला पकडले.

बातम्या आणखी आहेत...