आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून तरुणीचा वरुड येथे चाकूने भोसकून खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- एका ५५ वर्षीय व्यक्तीने अनैतिक संबंधातून प्रेयसीचा त्याच्याच खोलीमध्ये चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी येथे घडली. या घटनेनंतर खोलीला कुलूप लावून हा व्यक्ती त्याची पत्नी राहत असलेल्या तिच्या माहेरी कळमेश्वरला निघून गेला आणि थेट कळमेश्वर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. कळमेश्वर पोलिसांनी ही घटना वरुड पोलिसांना सांगितल्यावर सकाळी घडलेली ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास खोलीचे कुलुप तोडल्यानंतर उघड झाली. याप्रकरणी वरुड पोलिसांनी संबंधित व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगरुळी पेठ येथील गजानन महादेव यादव (वय ५५) या व्यक्तीचे बहादा ता. वरुड येथील रुपाली वासुदेव बायस्कर (वय२०) या तरुणीसोबत मागील सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. आरोपी हा मागील आठ वर्षांपासून वरुड येथील महेश कॉलनीत गिरीजा किसनराव मसराम यांच्या घरात भाड्याने राहत होता. घरमालक मसराम अमरावती येथे राहत होते. दरम्यान आरोपीस पत्नी व मुलगी असून ती त्याच्यापासून दोन वर्षांपासून कळमेश्वर येथे विभक्त राहते. वरुड येथे भाड्याच्या खोलीत आरोपीशिवाय दुसरे कुणी राहत नसल्याने तो या तरुणीला नेहमी खोलीवर बोलवायचा. नेहमीप्रमाणे ती शनिवारी दुपारी खोलीवर आली असता त्याने मद्यप्राशन केले. यानंतर वाद होऊन त्याने रुपाली हिचा चाकूने भोसकून खून केला. 

बातम्या आणखी आहेत...