आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसाेबतच्या अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नीसाेबत असलेल्या अनैतिक संबंधांतून एकाने तरुणाचा खून केल्याची घटना हडपसर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बालाजी पखाले (३०, रा. वडकीगाव हवेली, पुणे) याला अटक केली आहे. विशाल ओव्हाळ (३२)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल हा २९ सप्टेंबर रोजी सकाळी कामावर जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. मात्र,  तो ३० सप्टेंबरपर्यंत घरी न परतल्यामुळे त्याच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. 
 
आरोपी पखाले हा गुत्तेदारी करतो. मृत विशालच्या वडिलांचा देखील हाच व्यवसाय असल्याने दाेघांची ओळख झाली होती. त्यातून एकमेकांच्या घरी जाणे-येणे सुरू झाले होते. यातूनच विशालची व आरोपीच्या पत्नीची ओळख झाली. काही दिवसांनंतर मृत विशाल आणि आरोपीच्या पत्नीत प्रेमसंबध निर्माण झाले.  मात्र, याची कुणकुण पखाले याला लागली होती. आपल्या पत्नीचे विशालसाेबत संबंध असल्याचे समजल्यानंतर बालाजी हा गेल्या  काही दिवसांपासून अस्वस्थ होती. २९ सप्टेंबर रोजी दाेघांनी एकत्र दारू प्यायली. त्यानंतर बालाजी याने विशालला निर्जनस्थळी नेेले. या  ठिकाणी एका लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केले. यात त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...