Home | National | Uttar Pradesh | Murder in Shamli in Uttar Pradesh

कॉलेजच्या गेटवर 11 वीच्या विद्यार्थ्याची गोळी मारुन हत्या, एकुलता एक होता मुलगा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 04:49 PM IST

मंगळवारी दिवसाठवळ्या कॉलेजच्या गेटवर 11 वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली.

  • Murder in Shamli in Uttar Pradesh

    शामली | मंगळवारी दिवसाठवळ्या कॉलेजच्या गेटवर 11 वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर गुन्हेगार हे तिथून फरार झाले. ही घटना शामली जिल्ह्यातील कांधला गावात घडली. प्रियांशु असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. तो मुजफ्फरनगरचा राहणारा होता. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिक्षक अजय प्रताप सिंह म्हणाले की, पोलिस घटनेचा तपास करत आहेत. हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. आरोपी विद्यार्थी कॉलेजमधीलच आहेत. अजून त्यांचा तपास लागलेला नाही.


    - मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशु रोजच्या प्रमाणे मंगळवारी सकाळी हिंदू इंटर कॉलेजमध्ये गेला. कॉलेजच्या गेटवर पोहोचताच, तिथे दोन तरुण आले आणि त्यांनी त्याला बळजबरीने थांबवले. काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. याच वेळी आरोपीने बंदुक काढून प्रियांकच्या कानशिलात गोळी घातली. दिवसाठवळ्या ही घटना घडल्यामुळे विद्यार्थी भयग्रस्त आहे. मृत विद्यार्थी हा कुटूंबातील एकुलता एक मुलगा होता असे बोलले जातेय.

Trending