आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- शहरातील नागपुरी गेट भागातील असीर कॉलनीमध्ये राहणाऱ्या ताहेराबानो खून व लूटमारप्रकरणी गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी (दि. २७) महत्वाचा सुगावा हाती लागला असून,या आधारे पोलिस लवकरच मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ताहेराबानो यांचा १८ नोव्हेंबरला घरात खून झाला होता. ताहेराबानो यांच्या घरात सीसीटीव्ही लागलेले आहेत मात्र मारेकऱ्यांनी खून करण्याच्या आधल्या दिवशी रात्री नऊ वाजतापासून दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत कॅमेरा बंद करून ठेवले होते. त्यावरूनच मारेकरी हे ताहेराबानो यांच्या परिचित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. त्या आधारे पोलिसांनी ताहेराबानो यांच्या घरात नेहमी येणारे, घरकाम करणाऱ्यांना ताब्यात घेेवून चौकशी सुरू केली होती. मात्र त्यांच्या चौकशीअंती पोलिसांना ठोस असे काही हातात आले नाही. दरम्यान सोमवारी (दि. २६) गाडगेनगर पोलिसांनी ताहेराबानो यांच्या आणखी एका नजीकच्या व्यक्तीला ताब्यात घेवून चौकशी सुरू केली. याचदरम्यान पोलिसांना ताहेराबानो यांच्या घराच्या दिशेने जाणाऱ्या येणाऱ्या टिपणाऱ्यांना एका सीसीटीव्हीचे फुटेज प्राप्त झालेत. या फुटेजमध्ये पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलेला एक व्यक्ती आणि पूर्वीच ताब्यात असलेला अन्य एक हे दोघे जण खून होण्यापूर्वी आणि नंतर घराच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे खून कोणी केला, हे पोलिसांना आता जवळपास स्पष्ट झाले आहे, मात्र अटक करण्याइतपत ठोस पुरावे मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना मिळाले नव्हते.
२२ लाखांच्या घरफोडीचा अद्यापही सुगावा नाही
ताहेराबानो खून व लूटमारीच्या घटनेनंतर काही तासानेच राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील शारदानगरमध्ये टावरी यांच्या घरात तब्बल सुमारे २२ लाखांची चोरी झाली. आठ दिवस लोटूनही राजापेठ पेालिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.गाडगेनगर पोलिसांनाही मारेेकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी फारसा तांत्रिक आधार मिळाला नाही. मात्र डिसीपी, ठाणेदार, ठाण्यातील डि.बी.चे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रचंड परिश्रम घेऊन मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्याची मजल गाठली. दुसरीकडे राजापेठ पोलिसांना अजूनही चोरट्यांचा साधा सुगावासुद्धा मिळाला नाही.
दागिने व रोखचा शोध सुरू
ताहेराबानो यांचा खून ज्याने केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने लुुटलेले दागिने व रोख कुठे ठेवली, याबाबत तपास सुरू केला आहे. कारण पोलिसांना ज्यांच्यावर संशय आहे, त्यांनी खून केला तर ऐवजसुध्दा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस ऐवजाचा शोध घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.