आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात फ्लॅट अन‌् नांद्र्यात अडीच बिघे शेती घेऊन दिली तरी विवाहितेला विष पाजून मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नाशकात फ्लॅट, नांद्र्यात अडीच बिघे शेती घेऊन दिली. मात्र, तरीही सासरवासीयांनी मेहरुण येथील रामेश्वर काॅलनी भागात विवाहितेला विष पाजून मारले. तिने मृत्युपूर्व लिहिलेली चिठ्ठी माेबाइलवरून काैटुंबिक व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केली हाेती. त्यावरून माहेरवासीयांनी शनिवारी हा अाराेप केला. जळगावात खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेल्या या विवाहितेच्या नातेवाइकांनी सासरच्या मंडळींना बदडण्याचा प्रयत्न केला. 


जळगावातील मेहरूण भागात साेनिया कमलाकर पाटील (वय ३२) पती, सासू, सासऱ्यांसह राहायची. सासरच्या मंडळींनी तिला शनिवारी पहाटे खासगी रुग्णालयात दाखल केले. यात तिच्या शरीरात विषारी द्रव भिनला असल्याचे निदर्शनास अाले. उपचार सुरू असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. तिचे पती कमलाकर पाटील हे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत अभियंता म्हणून नाेकरीला अाहेत. त्यांना ८ वर्षांचा मुलगा व ५ वर्षांची मुलगी असे दाेन अपत्य अाहेत. साेनियाने शुक्रवारी मध्यरात्री काका सुरेश पाटील यांच्या माेबाइलवर संपर्क साधला हाेता. तिच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सासरच्या मंडळींनी तिचा माेबाइल उचलला, पण ते काहीच बाेलले नाहीत. पहाटे तिच्या दिराने घटनेची माहिती दिली. तिचा माेबाइलही पाण्यात पडला असल्याचे समाेर अाले. सासरच्या मंडळींकडून सातत्याने पैशांची मागणी व्हायची. याच तणावात दाेन वर्षांपूर्वी तिचे वडीलांचे हृदयविकाराने निधन झाले. असे असताना जावयाला नांद्रा येथे अडीच बिघे शेती, नाशकात फ्लॅट घेऊन दिला. तरीही सासरच्या मंडळींनी विषारी द्रव पाजून तिचा जीव घेतला, असा खळबळजनक अाराेप मृत विवाहितेचे काका सुरेश श्यामराव पाटील (नांद्रा. ता. जळगाव) यांनी रुग्णालयात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बाेलताना केला. दरम्यान, मृत विवाहितेचे शवविच्छेदन शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात करून मृतदेह नांद्रा येथील माहेरवासीयांच्या ताब्यात देण्यात अाला. 


चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल 
सोनिया पाटील यांच्या मृत्यू प्रकरणी भाऊ खुशाल पाटील (रा. नांद्रा बुद्रूक) यांच्या फिर्यादीवरून अभियंता पती कमलाकर गोविंदा पाटील, सासू उषाबाई पाटील, सासरा गोविंदा त्र्यंबक पाटील, दीर मिलिंद गोविंदा पाटील यांच्याविरूध्द भादंवि कलम ३०२ नुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊ खुशाल यांना सोनिया यांनी व्हाॅटसअॅपवर मृत्यूपूर्व चिठ्ठी पाठवली हाेती. विशेष म्हणजे त्यांच्या दिराने फोन करून उलट्या होत असल्याने गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले. सर्व नातेवाईक नांद्रा बुद्रूक येथून जळगावला हॉस्पिटलमध्ये आले. अतिदक्षता विभागात भाऊ खुशाल यांनी सोनियाची भेट घेतली. त्यावेळी सोनिया यांनी भावाशी संवाद साधला. शुक्रवारी रात्री ९ वाजता माहेरावरून सोन्याच्या बांगड्या का आणल्या नाहीत? यावरून पतीने भांडण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याकडे दुर्लक्ष करून झोपी गेली. रात्री कुणीतरी हातपाय धरत असल्याचे जाणवल्याने जाग अाली. सासरे व दीराने हात धरले. सासूने पाय दाबले व पतीने विषारी औषध पाजले. उलट्या करायला लागल्यावर सर्वजण एका खोलीत निघून गेले. त्यावेळी कागदावर चिठ्ठी लिहून मला व काका विजय सोनवणे यांना सोशल मीडियाव्दारे पाठवली. त्यानंतर एक तासाने सासरची मंडळी गणपती हॉस्पीटलमध्ये घेऊन आल्याचे बहिण सोनिया यांनी सांगितल्याचे खुशाल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून सोनिया यांचे पती, सासू, सासरे व दीर यांच्याविरूध्द जळगाव येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनिया व कमलाकर यांचा सन २००६मध्ये विवाह झाला होता. 


मृत साेनिया पाटील 
साेन्याच्या बांगड्यांसाठी छळ हाेत असल्याचे मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत केले नमूद 
विवाहिता साेनिया पाटील हिने मृत्युपूर्व लिहिलेली ही चिठ्ठी तिच्या फॅमिली व्हाॅट‌्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाली अाहे. 


विषारी द्रव अंगात भिनलेल्या या विवाहितेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिचे माहेर असलेले नांद्रा (ता. जळगाव) येथील नागरिक, नातेवाईक रुग्णालयात धडकले. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या सासरच्या मंडळींच्या अंगावर ते धावले. काहींनी बदडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार वेळीच लक्षात अाल्याने पाेलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला. पती, सासू, सासऱ्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. 


-  नाशिकच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत पती कमलाकर गाेविंद पाटील हे नाेकरीला अाहेत. जळगावचे मेहरूण हे अामचे सासर अाहेे. गणेशाेत्सवासाठी येथे अालाे हाेताे. सासरे व पती दाेघांनी मिळून मध्यरात्री विष पाजले. सासरची मंडळी लग्न झाल्यापासून मानसिक छळ करायचे. 


- माहेरी फाेन करून सासरची मंडळी पैशांची मागणी करायचे. त्याच तणावात वडिलांचे दाेन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी साेन्याच्या बांगड्या केल्या हाेत्या. त्यांच्या मृत्यूनंतर सासरवासीयांनी सातत्याने बांगड्या देण्याचा तगादा लावला जात असल्याने त्या माहेरी ठेवून दिल्या हाेत्या. 


- घरातील खर्चाची नाेंद माझ्या नवऱ्याने करून ठेवली हाेती. हा खर्च माझ्यावर झाला, असे ताे लाेकांना सांगायचा. मी अात्महत्या केली असे त्याला दर्शवायचे अाहे. माझं बरं वाईट झालं तर या लोकांना सोडू नका. यांना शिक्षा करा. माफ करू नका. पाण्याच्या टाकीत शोधा मला. 


- मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराच्या खाली सोनिया पाटील असे लिहून त्या खाली इंग्रजीत स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. या चिठ्ठीचा एक भाग फाटलेला आहे. उर्वरित तुकड्यावर काका सुरेश पाटील, मुलगी, आई लताबाई खुशाल पाटील यांच्या नावांचा उल्लेख आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...