आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढ 5 मुलांचा मृत्यूचे : एकाचवेळी 5 भावांचा अंत्यसंस्कार, आई-वडील फरार, आत्म्याच्या शांतीसाठी गावकऱ्यांचा शांतीपाठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडवानी - इंदूरच्या बडवानी येथे 5 भावांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ पसरली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या सर्वांचा मृत्यू बुडाल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण पाचही जण एकाचवेळी कसे बुडाले हा प्रश्न उपस्थित होत आहे. विहिरीत फेकण्याआधीच त्यांची हत्या झाली होता का, याचा शोध सध्या घेतला जात आहे. पोलिस या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मृत मुलांचे बेपत्ता वडील आणि त्यांची पहिली पत्नी (चार मुलांची आई ) चा शोध घेत आहेत. सोमवारी सकाळपर्यंत दोघे गावात दिसले होते. मुले त्यावेळी वडिलांबरोबर होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह आढळले. 


मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना 
पोलिसांनी गावकऱ्यांकडे चौकशी केली, त्यानुसार भतरसिंह आणि त्याची पहिली पत्नी सुंगीबाई दोघे सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गावात दिसले होते. त्यानंतर भतरसिंह मुलांबरोबर कुठेतरी गेला आणि संगीबाईदेखिल वेगळीकडे गेली. दोघेही बेपत्ता आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कौटुंहीक वाद नसल्याने पोलिसांकडून इतर अँगलचा शोध घेतला जात आहे. गावकऱ्यांनी मुलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याच्या शआंतीसाठी शांतीपाठ केला. सायंकाळी पोस्टमॉर्टर्मनंतर सर्वांचा एकत्र अंत्य संस्कार करण्यात आला. 


चिवडा घेऊन देतो म्हणून गेला तो परतलाच नाही 
दरम्यान भतरसिंहची दुसरी पत्नी सुनिताने सांगितले की, भतरसिंह रविवारी तिचा मुलगा रोहितला चिवडा घेऊन देतो म्हणून घेऊन गेला होता, त्यानंतर ते परतलेच नाही. सुनिता पाच महिन्यांची गर्भवती आहे. 


वडिलांवर संशय 
भतरियाचे काका छेंदासह आसपासच्या लोकांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील कौटुंबीक वादाबाबत फारशी माहिती कोणालाही नाही. पण ते बेपत्ता असल्यामुळे सगळेच त्यांच्यावर संशय घेत आहेत. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण मुलांचा विसेरा तपासणीसाठी पाठवला आहे. त्यानंतर याबाबत सर्वकाही स्पष्ट होईल. 


8 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून परतले 
भतरसिंहचे पहिले लग्न 10 वर्षांपूर्वी सुंगीबाईशी झाले होते. तिला चार मुले झाली. त्यानंतर 4 वर्षांपूर्वी त्याने सुनिताशी दुसरे लग्न केले. तिला एक मुलगा झाला. भतरसिंह अनेक वर्षांपासून मजुरीसाठी महाराष्ट्रात जातो. पहली पत्नी आणि मुले झिरीजामलीमध्ये राहतात. तर दुसरी पत्नी मजुरीसाठी महाराष्ट्रात पतीबरोबर जायची. तिचा मुलगा तिच्या माहेरी असायचा. भतरसिंह आणि सुनिता 8 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून परतले होते. सोयाबीनची कापणी ते करत होते. ते आल्यानंतर सुंगीबाई चार मुलांसह शनिवारी चिखलीला गेली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...